घरदेश-विदेशअनलॉक २.० ची योजना तयार करा

अनलॉक २.० ची योजना तयार करा

Subscribe

पंतप्रधानांचे मुख्यमंत्र्यांना निर्देश

लॉकडाऊनबद्दल ज्या अफवा पसरवल्या जात आहेत, त्याविरोधात लढण्याची गरज व्यक्त करतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनलॉक २.० ची योजना तयार करण्याची निर्देश विविध राज्यातील मुख्यमंत्र्यांना दिले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील करोना संकटाच्या पार्श्वभूमीवर १६ जून आणि १७ जून अशा दोन दिवस विविध राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठका घेतल्या. या बैठकांमध्ये मोदींनी देशात सुरू असलेल्या अनलॉक- १.० वर चर्चा केली. या वेळी त्यांनी देशात उपलब्ध असेलेल्या करोना विषाणूच्या चाचणी क्षमतेचा पुरेपूर वापर केला पाहिजे, अशी सूचनाही केली. तसेच, या चाचण्यांची क्षमता सतत वाढवत नेली पाहिजे, असेही ते म्हणाले.

- Advertisement -

देशात करोनाबाधितांची संख्या वाढत असल्याकारणाने देशात पुन्हा एकदा लॉकडाऊन घोषित केले जाईल अशा अफवा पसरलेल्या आहेत. मात्र, आता या अफवांशी लढावे लागेल असे मोदी म्हणाले. तसेच या पुढच्या काळात अनलॉक-२.० कसा असेल याचा पद्धतशीरपणे विचार करावा लागेल असे मोदी म्हणाले. करोना विषाणूचा प्रसार हा मोठी राज्ये आणि मोठ्या शहरांमध्ये अधिक असल्याचेही मोदी म्हणाले.

नरेंद्र मोदी म्हणाले की, देशातील आर्थिक व्यवहारांमध्ये गती आणण्याची आवश्यकता असल्याचेही पंतप्रधान मोदी या बैठकीत म्हणाले. राज्यांनी आपल्या राज्यातील पायाभूत सुविधा आणि उत्पादन कार्याला उत्तेजना देण्यासाठी पावले उचलावीत असेही ते म्हणाले. त्याच प्रमाणे येणार्‍या काळामध्ये स्थलांतरित मजुरांपुढील समस्या कोणत्या हे ओळखून त्या सोडवण्याच्या दिशेने राज्यांनी आता पावलं उचलायला हवीत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -