घरताज्या घडामोडीमहानगर इम्पॅक्ट : ST चालकांनी शिदोरी सोबत ठेवण्याचा आदेश रद्द!

महानगर इम्पॅक्ट : ST चालकांनी शिदोरी सोबत ठेवण्याचा आदेश रद्द!

Subscribe

मायमहानगरने प्रकाशित केलेल्या वृत्ताची दखल घेत आगार व्यवस्थापकांनी एसटी चालकांना शिदोरी नेण्याचा आदेश रद्द करण्यात आले.

मालवाहतूक बसेसच्या चालकांना एसटी महामंडळाने कर्तव्यावर जाताना तब्बल पाच दिवस पुरेल इतके जेवण सोबत बाळगण्याच्या अजब आदेश दिला होता. त्यामुळे कोरोनाकाळात पाच दिवसाचे जेवण सोबत बाळगायचे कसे असा मोठा प्रश्न एसटी कर्मचाऱ्यांना समोर पडला आहे. यासंबंधित वृत्त मायमहानगर व आपलं महानगरने प्रकाशित केले होते. त्यानंतर खळबळून जागे झालेल्या एसटी महामंडळाचा पंढरपूर आगारातील आगार व्यवस्थापकांनी एसटी चालकांना शिदोरी नेण्याचा आदेश  रद्द  करण्यांत आलेल्या आहे.

शिदोरी नेण्याचा आदेश रद्द

आर्थिक अडचणीवर मात करण्यासाठी आणि एसटीचे महसूल वाढविण्याकरिता एसटी महामंडळाने मालवाहतूक क्षेत्रात उतरली आहे. त्यानुसार मालवाहतुकीच्या कर्तव्यावर जाणाऱ्या सर्व चालकांनी आपल्या पुरेल इतके पाच दिवसांचे जेवण घेऊनच कर्तव्यावर जाणे, कारण मालवाहतुकीसाठी गेलेला एसटी त्वरित परत येईल याची शक्यता खुप कमी असते. त्यामुळे कोविड १९ विषाणूचा प्रादुर्भाव असल्याने एसटी कर्मचाऱ्यांची गैरसोय होण्याची शक्यता आहे. त्यामुळे कर्तव्यांवर जाणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांनी पाच दिवसांचे जेवण सोबतच घेऊनच कर्तव्यावर यावे अशी सूचना राज्य परिवहन महामंडळाचे पंढरपूर आगारातील आगार व्यवस्थापकांनी ७ जुलै २०२० रोजी एसटीच्या कर्मचाऱ्यांना दिली आहे. त्यांच्या सुचनेचं परिपत्रक सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या घटनेमुळे एसटी कर्मचाऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे. या संबंधित वृत्त मायमहानगर व आपलं महानगरने प्रकाशित केले होते. त्यानंतर एसटी महामंडळाने यांची दखल घेतत, एसटी चालकांना शिदोरी नेण्याचा आदेश रद्द करण्यांत आलेल्या आहे. त्याऐवजी नविन आदेश काढण्यांत आले आहे.

- Advertisement -

काय आहे नविन आदेश ?

राज्य परिवहन महामंडळाच्या पंढरपूर आगारातील आगार व्यवस्थापकाने ७ जुलै २०२० रोजी मालवाहतुकीसंबंधित काढलेला आदेश रद्द करण्यात आला आहे.  मंगळावरी एक नवीन आदेश काढून त्या सांगण्यात आले कि, मालवाहतुकीला जाणाऱ्या एसटी चालकांनी चार दिवस नियोजनात्मक मुक्कामाच्या तयारीत राहावेत. मात्र नविन आदेश निघताच एसटी कर्मचाऱ्यांनी तात्काळ मालवाहतुकीला जाणाऱ्या एसटी चालकांना पूर्णपणे सुविधा एसटी महामंडळाने  द्यावीत अशी मागणी केली आहे.
Nitin Binekar
Nitin Binekarhttps://www.mymahanagar.com/author/bnitin/
गेल्या ५ वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सार्वजनिक वाहतूक, शैक्षणिक विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -