घरताज्या घडामोडीCoronavirus: वाहन चालकांची पोलिसांसोबत हुज्जत

Coronavirus: वाहन चालकांची पोलिसांसोबत हुज्जत

Subscribe

मुंबईच्या दिशेने येणाऱ्या आणि मुंबई बाहेर जाणाऱ्या वाहनांनी भिवंडी ठाणे बायपास रस्त्यावर गर्दी केली होती.

करोना व्हायरसचा मुकाबला करण्यासाठी महाराष्ट्रात कलम १४४ लागू करून जमावबंदी सुरू केली. तरी सुध्दा रविवारच्या जनता कर्फ्यु नंतर सोमवारी मुंबईच्या दिशेने असंख्य वाहने निघाली होती. त्यामुळे मुंबईच्या प्रवेशद्वारावर मुलुंड टोल नाक्यावर वाहनांची प्रचंड गर्दी झाली होती. त्यामुळे ही गर्दी टाळण्यासाठी अखेर ठाणे भिवंडी बायपास रस्त्यावर मानकोली नाका या ठिकाणी स्थानिक नारपोली पोलिसांकडून रस्ता अडवून धरत वाहनांना परत माघारी पाठविले जात होते.


हेही वाचा – Coronavirus: आरोग्‍य यंत्रणेवर लक्ष केंद्रीत करा; मुख्यमंत्र्यांच्या विभागीय आयुक्तांना सुचना

- Advertisement -

भिवंडी ठाणे बायपास रस्ता हा मुंबई नाशिक महामार्गावरून मुंबईच्या दिशेने जाणारा मुख्य रस्ता असून या रस्त्यावर वाहनांची गर्दी वाढू लागली तशी स्थानिक नारपोली पोलिसांनी मुंबई च्या दिशेने जाणारी वाहतूक अडवून धरली होती. या वाहनांमधील अत्यावश्यक पेट्रोल, डिझेल, दूध, भाजीपाला वाहतूक करणाऱ्या ट्रक व अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी, अधिकारी यांच्या वाहनांना सोडले जात होते. असंख्य वाहन चालक आपण मुंबई येथील घरी जात असून इथे कुठे थांबून राहणार म्हणून हुज्जत घालत होते.

इंदोर येथील राध्येशाम जाट हे आपल्या ऐरोली येथील आपल्या कंपनी मध्ये काम करणाऱ्या मुलीला घरी घेऊन जाण्यासाठी कारने आले होते. परंतु मानकोली नाका येथे अडविल्याने ते चिंताक्रांत झाले होत. मला मुंबईत थांबायचे नसून फक्त मुलीला घेऊन माघारी इंदोर येथे जायचे आहे, अशी विनंती करूनही पोलिसांकडून योग्य ते सहकार्य मिळत नसल्याची तक्रार करीत जर मला इंदोर अथवा महाराष्ट्र सीमेवर अडविले असते तर मी इथपर्यंत पोहोचलोच नसतो, असे जाट म्हणाले.

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -