घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रलेकराप्रमाणे जपलेल्या कांद्याची शेतकऱ्याने केली होळी

लेकराप्रमाणे जपलेल्या कांद्याची शेतकऱ्याने केली होळी

Subscribe

होळीच्या दिवशी शेतकरयाने उचलले मोठे पाउल; मुल गेल्यासारखे दुःख होत असल्याची व्यक्त केली भावना

नाशिक : गेल्या काही दिवसांपासून कांद्याचे भाव मोठया प्रमाणावर घसरले आहे. त्यामुळे नाशिक जिल्हयातील शेतकरी मोठया प्रमाणावर आक्रमक झाले आहेत. कांद्याला कवडीमोल किंमत मिळत असल्याने शेतकर्‍यांमध्ये संतापाची भावना निर्माण झाली आहे. कांद्याची विक्री केल्यानंतर अगदी दहा ते १०० रुपये इतके पैसे हातात येत असल्याने शेतकरी हवालदील झाले आहेत. आता नाशिक जिल्ह्यात येवला तालुक्यातील कांदा उत्पादक शेतकर्‍यांनी आपल्या दिड एकर क्षेत्रावरील कांद्याची होळी करत सरकारच्या भूमिकेचा निषेध व्यक्त केला.

जिल्हयात गेल्या काही दिवसांपासून कांद्याचा प्रश्न अत्यंत गंभीर होत चाललेला आहे. शेतकर्‍यांच्या कांद्याला भाव मिळत नाही. तयामुळे शेतकरी आक्रमक झाले असून येवला तालुक्यात शेतकरी कृष्णा डोंगरे या शेतकर्‍याने होळीच्या दिवशी आपल्या दिड एकरातील कांद्याची होळी केली. या शेतकर्‍याने पंधरा दिवसांपूर्वी कांदा अग्निडाग समारंभ आयोजित केल्याची पत्रिका सोशल मिडीयावर व्हायरल करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना देखील निमंत्रण दिले होते. अखेर आजच्या होळीच्या दिवशी सरकारच्या धोरणाला वैतागून या शेतकर्‍याने तब्बल दीड एकरावरील कांद्याला अग्निडाग दिला आहे. केंद्र आणि राज्य सरकारांनी शेतकर्‍यांना वार्‍यावर सोडून दिले आहे. शेतकर्‍यांचे जगणे सरकारला मान्य नाही. उत्पादकांनी कष्टाने पिकवलेला कांदा जाळून टाकला आहे. आजचा दिवस काळा दिवस आहे. शेतकरी जगला काय आणि मेला काय सरकारला देणे- घेणे नसल्याचे सांगत शेतकर्‍याने व्यथा मांडली.आपल्या हाताने पिकवलेला कांदा असा बेचिराख होतांना पाहून हा शेतकरी ढसाढसा रडला. मुल गेल्यासारखे दुःख होत असल्याची प्रतिक्रिया डोंगरे यांनी व्यक्त केली.

- Advertisement -
उद्विग्न भावना 

रात्रंदिवस मेहनत करून देखील कांद्याला हमीभाव मिळत नाही. आज त्यांचा कुटुंब शेतीवर चालते. आज दीड एकरवर सव्वा लाख रुपये खर्चून कांद्याचे पीक घेतले होते. मात्र कांदा दरात झालेली घसरण, त्यानंतर सरकारची फसवी आश्वासने, नाफेडची कांदा खरेदी यातून हे पाऊल उचलल्याचे आंदोलनात सहभागी झालेल्या एका महिलेने सांगितले.

केंद्र सरकार, राज्य सरकार हे सत्तासंघर्षात मश्गूल आहेत. शेतकरी जगतोय की मरतोय याकडे सरकारचे लक्ष नाही. शेतकर्‍यांचे जगणे सरकारला मान्य नाही. रात्र दिवस एक करून कांदा पिकवला. महाराष्ट्रासाठी नाही तर देशासाठी काळा दिवस आहे. स्वत:च्या हाताने पिकवलेला कांदा एका शेतकर्‍याला केंद्राच्या आणि राज्याच्या आडमुठ्या धोरणामुळे जाळावा लागत आहे. कांद्याला आतापर्यंत सव्वा लाख रुपये खर्च लागलेला आहे. आणि बाजारात गेलो तर आणखी तोटा सहन करावा लागत आहे. त्यामुळे हा कांदा जाळण्याची वेळ माझ्यावर आलेली असून सरकारने कोणत्याही प्रकारची दखल घेतली नाही. नाफेड ही संस्था पूर्णपणे शेतकरी विरोधी असून ती ग्राहकांसाठी काम असल्याचा आरोप शेतकर्‍याने केला आहे. : कृष्णा डोंगरे, शेतकरी

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -