घरमहाराष्ट्रभिवंडीत गोदाम मजूरांना चाकूचे वार करून लुटले

भिवंडीत गोदाम मजूरांना चाकूचे वार करून लुटले

Subscribe

मोबाईल न दिल्याने संतापलेल्या लुटारूंपैकी एकाने धारदार चाकूने त्याच्या डोक्यासह शरिरावर इतर भागावर सपासप वार करून मजुरांना गंभीर दुखापत केली आहे.

भिवंडी गोदामातील रात्रपाळीचे काम उरकून घरी जाण्यासाठी निघालेल्या दोघा मजूरांना एफझेड मोटार सायकलवरून आलेल्या लुटारूंनी माणकोली पाईपलाईन रोडवर अडवले. त्यानंतर, एका मजूरावर चाकूचे वार करून मोबाईल हिसकावून नेल्याची घटना मंगळवारी मध्यरात्री घडली आहे.

कामावरून घरी परतांना मजूरांना अडवले

भंडारी कंपाऊंड येथे राहणाऱ्या राहुल रामशंकर गौंड (२०) व रोहित सिंग (२२) असे चोरट्यांनी धमकावून चाकू हल्ला केलेल्या मजूरांची नांवे आहेत. हे दोघे मजूर हायवेदिवे येथील इंडियन लॉजिस्टिक गोदामात काम करतात. ते कामकाज उरकून मध्यरात्री घरी जाण्यासाठी पाईपलाईन रोडने पायी निघाले होते. त्यावेळी, त्यांच्या पाठीमागून एकजण येऊन त्यापाठोपाठ दोघेजण मोटार सायकलवरून आले. या तिघांनी संगनमताने दोघा मजूरांना रस्त्यात अडवून त्यांच्या मानेवर चाकू लावून मोबाईल हिसकावू लागले.

- Advertisement -

चाकूने वार करून गंभीर दुखापत

रोहित सिंग याने घाबरून त्याच्याकडील ८ हजार रुपये किंमतीचा मोबाईल काढून दिला. मात्र राहुल गौंड याने त्याच्याकडील मोबाईल देण्यास नकार दिला. यावरून संतापलेल्या लुटारूंपैकी एकाने धारदार चाकूने त्याच्या डोक्यासह शरिरावर इतर भागावर सपासप वार करून गंभीर दुखापत केली आहे. या चाकू हल्यात जखमी झालेल्या राहुल गौंड यास तात्काळ माणकोली नाका येथील लोटस हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. या घटनेप्रकरणी नारपोली पोलीस ठाण्यात तीन अज्ञात लुटारुंच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक आर. जे. वरकाटे करित आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -