घरमहाराष्ट्रअकोलेः मजुरांसाठी सरकारने खावटी सुरु करावी; माजी आमदाराची मागणी

अकोलेः मजुरांसाठी सरकारने खावटी सुरु करावी; माजी आमदाराची मागणी

Subscribe

माजी आमदार वैभव पिचड यांची मागणी

जगभर कोरोनाने उच्छाद मांडला असतांना यामुळे मृत्यूचा आकडादेखील दररोज वाढत आहे. कोरोनाची देश आणि राज्यातील साखळी तोडण्यासाठी सरकारने २१ दिवसांच्या लॉकडाऊनसह संचारबंदीदेखील लागू केली आहे. सरकारचा हा निर्णय चांगला असला तरी यामुळे गरिब, मजुर आणि आदीवासी लोकांचे मोठे नुकसान होणार आहे. त्यांच्यासमोर दररोजच्या अन्नाची चिंता वाढली आहे. अशा स्थितीत सरकारने खावटी सुरु करावी, अशी मागणी अकोलेचे माजी आमदार वैभव पिचड यांनी केली.

पिचड यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे व आदीवासी विकास मंत्री के. सी. पाडवी यांच्याकडे ही मागणी केली आहे. लाॅकडाऊनमुळे सर्व व्यवहार ठप्प झाले आहेत. तर संचारबंदीमुळे गरिब, मजुरांना रोजीरोटीसाठी आपल्या घराबाहेर पडता येत नाही. हाताला काम नसल्याने त्यांच्यासमोरिल भाकरीची चिंता वाढली आहे. अकोले तालुक्यात बहुसंख्य आदीवासी समाज असल्याने आणि बहुतांशी लोकांचे पोट हातावर असल्याने त्यांना मजुरी मिळत नसल्याने त्यांच्यावर उपासरमारीची वेळ आली आहे.

- Advertisement -

हेही वाचा – सांगलीच्या पोलिसांना सलाम; ६०० मजुरांना जेवणासह राहण्याची सोय

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी अनेक व्यवसाय बंद करण्यात आले आहे. तालुक्यातील बाहेरगावी कामानिमित्त गेलेले आदिवासी मजूर त्यामुळे तालुक्यात घरी परत येत आहे. हे नागरिक रोज काम करून आपले पोट भरीत असल्याने आता त्यांच्या हातालाच काम शिल्लक राहिले नाही. त्यामुळे त्यांना दररोज जीवन जगणे दिवसेंदिवस कठीण होत आहे. सरकारने खावटी सुरु न केल्यास या भागातील लोकांची उपासमार होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शासनाने या लोकांसाठी खावटी सुरू करावी, असे त्यांनी म्हटले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -