घरCORONA UPDATEसांगलीच्या पोलिसांना सलाम; ६०० मजुरांना जेवणासह राहण्याची सोय

सांगलीच्या पोलिसांना सलाम; ६०० मजुरांना जेवणासह राहण्याची सोय

Subscribe

सांगलीच्या पोलिसांनी तब्बल ६०० मजुरांना जेवण, नाश्ता आणि राहण्याची सोय केली आहे. त्यामुळे पोलिसांच्या या कामगिरीचे सध्या सर्वच स्तरातून कौतुक केले जात आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात लॉकडाउन करण्यात आले आहे. मात्र, लॉकडाउन असून देखील अनेक जण विनाकारण बाहेर फिरताना दिसतात. अशा व्यक्तींवर पोलिसांकडून धडक कारवाई केली जात आहे. अनेकांना काठीचा प्रसाद देखील मिळत आहे. त्यामुळे अनेकजण पोलिसांवर टीका करत आहेत. पण याच दरम्यान, सांगलीच्या पोलिसांना पाहून सलाम करावासा वाटत आहे. कारण सांगलीच्या पोलिसांनी तब्बल ६०० मजुरांना जेवण, नाश्ता आणि राहण्याची सोय केली आहे. पोलिसांच्या या कामगिरीचे सध्या सर्वच स्तरातून कौतुक केले जात आहे.

जेवण, नाश्ताची सोय

लॉकडाउन घोषित केल्यामुळे सपूर्ण सांगली बंद करण्यात आली आहे. त्यामुळे मजुरांचे मोठे हाल होत आहेत. तसेच अनेक जणांनी वाहन नसल्यामुळे पायी घराची वाट धरली आहे. पण, राज्याच्या सीमाही बंद करण्यात आल्याने मजुरांना आपल्या घराकडे जाता येत नाही, अशाच कठीण परिस्थितीत पोलिसांनी मजुरांसाठी राहण्याची आणि जेवणाची सोय केली आहे.

- Advertisement -

सांगलीमधील मिरज आणि एमआयडीसी परिसरातील ६०० मजुरांना एका ठिकाणी बोलावले. तसेच मोठ्या क्रीडांगणावर सर्व मजुरांना पाट फुटांवर बसवून मार्गदर्शन केले आणि आरोग्याची देखील तपासणी केली आहे. दरम्यान, या घटनेतून पोलिसांकडून लाठी नाही तर मदतीचा हात देखील मिळत असल्याचे दिसून आले आहे.


हेही वाचा – प्रशासनाच्या नाकावर टिचून श्रीरामपुरात गावठी दारूची निर्मिती

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -