घरक्राइमधक्कादायक! प्रियकराने प्रेयसीला भर रस्त्यात जिवंत जाळले

धक्कादायक! प्रियकराने प्रेयसीला भर रस्त्यात जिवंत जाळले

Subscribe

प्रेमीयुगलात टोकाचा वाद होऊन प्रियकराने आपल्या विवाहित प्रेयसीला भर चौकात जिवंत जाळल्याची घटना उघडकीस आली आहे.

बऱ्याचदा प्रेमीयुगुलात छोटे मोठे वाद होत असतात. मात्र, या वादाचे रुपांतर हत्येत झाल्याची धक्कादायक घटना नागपूरमध्ये घडली आहे. या घटनेमुळे संपूर्ण नागपूर हादरुन गेले आहे. प्रेमीयुगलात टोकाचा वाद होऊन प्रियकराने आपल्या विवाहित प्रेयसीला भर चौकात जिवंत जाळल्याची घटना उघडकीस आली आहे. ही भयंकर घटना अंजुमान अभियांत्रिकी महाविद्यालयासमोर शुक्रवारी सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास घडली आहे. आगीत होरपळलेल्या प्रेयसीने उपचारा दरम्यान प्राण सोडले आहे.

नेमके काय घडले?

नागपूरमधील शबाना जावेद (४०), असे मृत महिलेचे नाव असून त्या धंमतोली आदित्य मोटर्स येथे कार्यरत होत्या. शुक्रवारी सायंकाळी त्यांचा प्रियकरासोबत वाद झाला. बघता बघता त्यांच्यातील वाद टोकाला गेला. संतापलेल्या प्रियकराने रागाच्या भरात बाटलीतील पेट्रोल शबाना यांच्या अंगावर टाकले. त्यानंतर शबाना यांना पेटवून देत प्रियकर घटनास्थळावरुन पसार झाला.

- Advertisement -

दरम्यान, प्रियकर दुचाकीवर निघून गेल्यानंतर आजूबाजूच्या नागरिकांनी हे दृश्य बघून घटनास्थळी धाव घेतली. आग विझवून शबाना यांना खासगी रुग्णालयात दाखल केलं. मात्र, उपचारादरम्यान शनिवारी सकाळी त्यांचा मृत्यू झाला. सदर पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत.

हुंडा न दिल्याने सूनेचा छळ

प्रियकराने प्रेयसीला जाळल्याची घटना ताजी असताना याच शहरात विवाहितेच्या खुनाचा प्रयत्न केल्याची घटना समोर आली आहे. लग्नात महागड्या वस्तू न मिळाल्याने सासऱ्याने नातेवाईकांच्या मदतीने २६ वर्षीय विवाहितेला चौथ्या मजल्यावरुन ढकलून ठार मारण्याचा प्रयत्न केला. न्यू नरसाळा मार्गावरील शारदा कॉम्प्लेक्स येथे २३ डिसेंबरला घडली. करिश्मा साकेत तामगाडगे, असं जखमी विवाहितेचं नाव आहे. याप्रकरणी पोलिसांनी पती साकेत भीमराव तामगाडगे, सासरे भीमराव तामगाडगे, सासू ललिता, नणंद प्राची राहुल वासनिक आणि प्राची यांचे पती राहुल या पाच जणाविरुद्ध खुनाचा प्रयत्न केल्याचा आणि हुंडा प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

हेही वाचा – कोरोना जनजागृतीसाठी ते धावले ‘नाशिक ते शिर्डी’


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -