घरमहाराष्ट्रमंत्रालय बनलं कोरोनाचं हॉटस्पॉट; १४ मंत्र्यांसह अनेक अधिकाऱ्यांना संसर्ग

मंत्रालय बनलं कोरोनाचं हॉटस्पॉट; १४ मंत्र्यांसह अनेक अधिकाऱ्यांना संसर्ग

Subscribe

राज्यात कोरोनाचे रुग्ण दिवसागणिक वाढत असताना आता ज्या ठिकाणाहून राज्याचा कारभार चालवला जात आहे, ते मंत्रालयच आता कोरोनाचं हॉटस्पॉट बनलं आहे. आतापर्यंत १४ मंत्री, अनेक अधिकारी-कर्मचाऱ्यांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. राज्यातील कारभार चालण्यासाठी मंत्रालयात मंत्री येत आहेत. मात्र, अनेक मंत्र्यांना कोरोनाची लागण झाल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.

राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांना कोरोनाची लागण झाल्याचं आज समोर आलं. याआधी अनेक मंत्र्यांना कोरोनाची लागण झाली आहे. शिवाय, मंत्रालयातील अनेक कर्मचाऱ्यांना देखील कोरोनाचा संसर्ग झाला आहे. दरम्यान, सद्यस्थितीत राज्य सरकारमधील नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे आणि शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड कोरोना पॉझिटिव्ह आहेत.

- Advertisement -

दरम्यान, याआधी गृहनिर्माण मंत्री, जितेंद्र आव्हाड, सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण, सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे, सहकारमंत्री बाळासाहेब पाटील, दुग्धविकास आणि पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार, उर्जामंत्री नितीन राऊत, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, अस्लम शेख, राज्यमंत्री विश्वजीत कदम, संजय बनसोडे, बच्चू कडू, अब्दुल सत्तार यांना कोरोनाची लागण झाली होती. यासह अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत आणि नितीन राऊत यांच्या कार्यालयातील प्रत्येकी ५ ते ६ कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली होती. यामुळे मंत्रालयातील कार्यालये काही दिवस बंद ठेवण्यात आली होती.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -