घरमहाराष्ट्रचूक माझीच आणि ती मी कबूल केलीय, उद्धव ठाकरेंची बेधडक मुलाखत

चूक माझीच आणि ती मी कबूल केलीय, उद्धव ठाकरेंची बेधडक मुलाखत

Subscribe

दिलं तरी माझं ते माझं आणि तुझं तेही माझं, इथपर्यंत होतं. आता याचं तेही माझं आणि त्याचं तेही माझं. इथपर्यंत यांची हाव गेली आहे. या हावरटपणाला काही सीमा नसल्याचंही उद्धव ठाकरेंनी सांगितलंय

मुंबईः चूक माझी आहे आणि ती पहिलीच माझ्या फेसबुक लाइव्हमध्ये कबूल केली आहे. गुन्हा माझा आहे. तो म्हणजे मी यांना परिवारातले समजून यांच्यावर अंधविश्वास ठेवला, असं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे म्हणालेत. सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची एक विशेष मुलाखत घेतलीय. या मुलाखतीत अनेक प्रश्नांना उद्धव ठाकरेंनी बेधडक उत्तरं दिलीत.

तुमचं मुख्यमंत्री होणं चुकलं?, असा सवाल संजय राऊतांनी विचारला असता ते म्हणाले, दोन गोष्टी आहेत. समजा मी त्यांना त्या वेळेला मुख्यमंत्री केलं असतं. त्यांनी आणखी काहीतरी वेगळं केलं असतं. कारण त्यांची भूकच भागत नाही. त्यांना मुख्यमंत्रिपद पण पाहिजे आणि आता शिवसेनाप्रमुख व्हायचंय? शिवसेनाप्रमुखांबरोबर स्वतःची तुलना करायला लागलात? ही राक्षसी महत्त्वाकांक्षा आहे. याला हावरटपणा म्हणतात. म्हणजे दिलं तरी माझं ते माझं आणि तुझं तेही माझं, इथपर्यंत होतं. आता याचं तेही माझं आणि त्याचं तेही माझं. इथपर्यंत यांची हाव गेली आहे. या हावरटपणाला काही सीमा नसल्याचंही उद्धव ठाकरेंनी सांगितलंय.

- Advertisement -

आज जी शिवसेनेत फूट दिसते आहे. अशा प्रकारची फूट राणे, भुजबळांनाही पाडता आली नाही. असं का घडलं? असं विचारले असता उद्धव ठाकरे म्हणाले, याचं कारण असं आहे की, ज्यांना मी अधिकार दिले होते त्यांनीच माझा विश्वासघात केला. त्यावेळी लोक माझ्या तोंडावर बोलत नव्हते, पण मला कुजबूज ऐकू यायची की, काय हे मुख्यमंत्री आहेत; नगरविकास खातं मुख्यमंत्र्यांकडे असायला पाहिजे. मलईदार खातं आहे म्हणतात. पण मी ते खातं माझ्याकडे न ठेवता विश्वासाने त्यांच्याकडे सोपवलं होतं. मी मलई बिलई खाण्यासाठी गेलो नव्हतो. मी माझ्याकडे जी खाती ठेवली होती ती एक म्हणजे सामान्य प्रशासन, दुसरे न्याय व विधी. होय, आयटीही ठेवलं, कारण खरंच या तंत्रज्ञानाचा उपयोग सगळ्या खात्यांसाठी काहीतरी करता येईल का? हा माझा विचार होता, असंही उद्धव ठाकरे म्हणालेत.


हेही वाचाः महाविकास आघाडीचा प्रयोग चुकला?, उद्धव ठाकरे म्हणतात…

Vaibhav Desai
Vaibhav Desaihttps://www.mymahanagar.com/author/vaibhavr/
गेल्या 14 वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत; प्रिंट मीडिया चार वर्षे अनुभव, डिजिटल माध्यमाचा साडेनऊ वर्षांचा अनुभव आहे. तसेच अर्थकारण विषयावर लिखाणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -