घरमहाराष्ट्र...मग तुम्ही महाराष्ट्राच्या मातीत जन्माला कसे आलात?, उद्धव ठाकरेंचा नाव न घेता...

…मग तुम्ही महाराष्ट्राच्या मातीत जन्माला कसे आलात?, उद्धव ठाकरेंचा नाव न घेता शहाजी बापू पाटलांना सवाल

Subscribe

एकनाथ शिंदे आणि त्यांच्या समर्थक आमदारांचे बंड झाल्यानंतर राज्यात सत्तांतर झाले. यानंतर सामनाचे संपादक संजय राऊत यांनी उद्धव ठाकरेंची मुलाखत घेतली. या मुलाखतीत आमदार शहाजीबापू पाटील यांच्या ‘काय झाडी…, काय डोंगर… या डायलॉगवरून शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिंदे गटावर टीका केली.

ग्रामीण आमदारांना महाराष्ट्राच्या निसर्गाची भुरळ पडत नाही –

- Advertisement -

या वेळी पक्ष प्रक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांना खासदार संजय राऊत यांनी महाराष्ट्रात पण झाडं आहेत, डोंगर आहेत, हाटेल आहे.. महाराष्ट्र तर फारच सुंदर आहे, असा प्रश्न विचारला. यावर किती सुंदर आहे महाराष्ट्र… ग्रामीण भागातल्या आमदारांना महाराष्ट्राच्या या निसर्गाची भुरळ पडत नाही आणि गुवाहाटीच्या निसर्गाची भुरळ पडते. मला एक कळलंच नाही की मग तुम्ही महाराष्ट्राच्या मातीत जन्माला तरी कसे आलात? ज्या महाराष्ट्राच्या मातीत जन्माला आलात त्या मातीची तुम्हाला ओढ नाही, प्रेम नाही, त्या मातीचं वैभव दिसलं नाही, असा सवाल त्यांनी शिंदे गटातील आमदारांना विचारला.

पण हे काय आपल्या मातीसाठी करणार? –

- Advertisement -

पुढे त्यांनी मी स्वतः एक कलाकार आहे. त्याच्यावरूनही त्यावेळी चेष्टा झाली होती. पण मी गडकिल्ल्यांची फोटोग्राफी केली आहे. पंढरपूरच्या वारीची केली आहे आणि त्यावेळी मी जो महाराष्ट्र बघितला. त्यावेळी पावसाच्या सुमारास मी ही सगळी फोटोग्राफी केली. इतका नटलेला, थटलेला महाराष्ट्र, दऱयाखोऱया छान फुलांनी बहरून जातात.. मी तर शहरी बाबू. तुम्ही तर ग्रामीण भागातले. त्या ग्रामीण भागात राहून तुम्हाला महाराष्ट्राचं सौंदर्य दिसत नाही. त्याचं वर्णन करावंसं कधी वाटलं नाही आणि डायरेक्ट गुवाहाटी? मी गुवाहाटीला वाईट म्हणत नाही. प्रत्येक प्रदेश चांगलाच असतो. पण हे काय आपल्या मातीसाठी करणार?, असा टोला त्यांनी शिंदे गटातील आमदारांना लगावला.

Ajinkya Desai
Ajinkya Desaihttps://www.mymahanagar.com/author/ajinkyadesai/
मागील 4 वर्षापासून डिजिटल मिडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -