घरमुंबईघाटकोपरमधील नाल्यात पडलेल्या म्हशीची अखेर चार तासाने सुटका

घाटकोपरमधील नाल्यात पडलेल्या म्हशीची अखेर चार तासाने सुटका

Subscribe

घटनास्थळी अग्निशमन दल पोहोचले आणि त्यांनी नाल्यात अडकलेल्या म्हशीची सुटका केली. ही घटना सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडली.

मुंबई: घाटकोपर पश्चिम(ghatkopar west) येथील श्रेयस सिग्नलसमोरील चेंबरमधून एक म्हैस नाल्यात अचानक पडल्याची घटना घडल. या म्हशीची तब्बल चार तासांनी सुखरूप सुटका करण्यात आली. घटनास्थळी अग्निशमन दल पोहोचले आणि त्यांनी नाल्यात अडकलेल्या म्हशीची सुटका केली. ही घटना सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडली.

हे ही वाचा – ज्या आईने जन्म दिला, त्या आईला गिळायला निघालेली ही अवलाद, उद्धव ठाकरेंचा…

- Advertisement -

मिळालेल्या माहितीनुसार, घाटकोपर – अंधेरी लिंक रोडवरील(ghatkopar – andheri link road) एका इमारतीसमोरील नाल्यावरील भागात एका व्यक्तीने बारकायदेशीर रित्या तबेला उभा केला आहे. त्या तबेल्यात काही म्हशी, पाडे ठेवले आहेत. सदर तबेल्याचा मालक हा म्हशींचे दूध काढून त्याची विक्री करतो. याच तबेल्यातील एक म्हैस सोमवारी मध्यरात्री २ वाजताच्या सुमारास जवळील मोठया नाल्यावरील चेंबरमधून थेट नाल्यात पडली. सथनिकांनी त्या म्हशीला काढण्याचा प्रयत्न केला पण स्थानिकांच्या प्रयत्नांना यश आले नाही. स्थानिकांच्या अतधक प्रयत्नानंतर अखेर म्हैस नाल्यातून बाहेर काढण्यासाठी आखेर अग्निशमन दलाला(fire brigade) पाचारण करण्यात आले.

हे ही वाचा – शिवसेना पुन्हा सर्वोच्च न्यायालयात

- Advertisement -

घटनास्थळी अग्निशमन दलाच्या(fire brigade) जवानांनी धाव घेत जेसीबी आणि दोरखंड यांचा वापर करून त्या म्हशीची सुटका केली. चार तासांच्या अथक प्रयत्नांनी अग्निशमन दलाच्या जवानांहि यशस्वी म्हशीची सुटका केली. या सगळ्या घटनेत मात्र म्हैस मार लागून जखमी झाली. जखम झाल्याने म्हशीच्या शरीरातून रक्तस्त्राव होऊ लागला. जखमी अवस्थेत असलेल्या त्या म्हशीला नाल्यामधून बाहेर काढून तिच्या मालकाच्या ताब्यात देण्यात आले.

सदर म्हशीला वाचविण्यासाठी विक्रोळी अग्निशमन दलाचे केंद्र अधिकारी श्री.अडांगले सर, अजय जाधव, संतोष जाधव, हरिशचंद्र रावराणे, सोमनाथ गोडे, सोनल पाटील, रवी दुधवडे, प्रमुख अग्निशामक शिवाजी धनावडे, प्रदीप भोसले, रमेश पाटील, मिलिंद पाटील, प्रतिभा सूरवाडे, जितेंद्र वेजरे आदींनी दोरखंड, जेसीबी यांच्या साहाय्याने नाल्यात पडलेल्या म्हशीला सुखरूपपणे बाहेर काढून चांगले योगदान दिले आणि म्हशीचे प्राण वाचविले.

हे ही वाचा –  पंकजा मुंडेंच्या कार्यकर्त्यांची नाराजी स्पष्ट; वाढदिवसाच्या बॅनरवरूर भाजप नेत्यांचे फोटो गायब

nidhi pednekar
nidhi pednekarhttps://www.mymahanagar.com/author/nidhipednekar/
मागील ४ वर्षांपासून आकाशवाणीवर मुंबई येथे कंटेन्ट रायटर आणि अँकर म्हणून काम करण्याचा अनुभव, पॉलिटिकल पि.आर. मॅनेजमेंट क्षेत्रात काम करण्याचा अनुभव त्याचसोबत ललित, मनोरंजन, राजकीय घडामोडी, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -