घरमहाराष्ट्रसमाजाला एकसंध ठेवण्याची गरज; शरद पवार यांचे प्रतिपादन

समाजाला एकसंध ठेवण्याची गरज; शरद पवार यांचे प्रतिपादन

Subscribe

देशात पुन्हा एकदा समाजात दरी निर्माण करून वाद वाढविण्याचा प्रयत्‍न सुरू आहे.शैक्षणिक अभ्‍यासक्रमात बदल करून वेगळया विचारांची नवी पिढी निर्माण करण्याचे काम योजनाबद्ध रितीने सुरू आहे.हे टाळायचे असेल तर समाज एकसंध ठेवण्यासाठीचे प्रयत्‍न करण्याची गरज असल्‍याचे प्रतिपादन राष्‍ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी शनिवारी येथे केले.

शरद पवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत त्यांच्या। भाषणांचे संकलन असलेल्या पुस्तकाचा प्रकाशन आज वरळीच्या नेहरू सेंटरमध्ये पार पडला. त्यावेळी कार्यक्रमात ज्येष्ठ पत्रकार अनंत बागाईतकर यांनी शरद पवार यांना भविष्‍यातील भारताबददल प्रश्न विचारला होता.त्यावेळी बोलताना शरद पवार म्‍हणाले,देशात सध्या जे काही चालले आहे ते पाहिले असता असे वाटते की एका योजनाबद्ध रितीने धोरणाची अंमलबजावणी करण्यात येत आहे.मुख्य चिंता वाटते ती की शैक्षणिक अभ्‍यासक्रमात बदल करून त्यातून वेगळा विचार पेरण्याचे काम सुरू असल्‍याची. त्‍यात यश मिळाले तर पुढची पिढी वेगळया विचारांची बनेल.समाज दुबळा करण्याचे काम सुरू आहे.त्‍यासाठी जाणकारांनी गांभीर्याने विचार केला पाहिजे.

- Advertisement -

कालच राज्‍यसभेत भाजपचे एक खासदार म्‍हणाले,राममंदिराबाबत आम्‍हाला जे करायचे ते केले.आता दोन गोष्‍टी करायच्या आहेत.त्‍यासाठी सामूहिक शक्‍ती पणाला लावली पाहिजे, याचा अर्थ स्‍पष्‍ट आहे.बाबरीच्या वेळी जे चित्र होते तेच पुन्हा निर्माण करायचे आहे.या स्‍थितीला जर आपल्‍याला सामोरे जायचे असेल तर समाजाला एकसंध ठेवण्याची गरज आहे, असे पवार म्‍हणाले.

राजकारणात कमी कष्‍टात यश मिळविण्याचा मंत्र

शरद पवार हे त्‍यांच्या अचूक स्‍मरणशक्‍तीबाबत ओळखले जातात.जी व्यक्‍ती त्‍यांना एकदा भेटते तिचे नाव त्‍यांच्या कायम स्‍मरणात राहते.त्‍यांच्या स्‍मरणशक्‍तीबाबत त्‍यांना विचारले असता शरद पवार म्‍हणाले,राजकारणात कमी कष्टात,कमी भांडवलात तुम्‍हाला यश मिळू शकते.त्‍यासाठी समोरच्याचे फक्‍त नाव लक्षात ठेवण्याची गरज आहे.त्‍यासाठी शरद पवार यांनी ते मुख्यमंत्री असतानाचा एक किस्‍सा सांगितला.त्‍यांना भेटण्यासाठी त्‍यांच्याच मतदारसंघातील एक महिला काम घेऊन आली होती.तेव्हा त्‍यांनी तिला विचारले की काय ग कुसूम,काय काम काढलस मुंबईत.तेव्हा ती महिला हरखून गेली.काम होवो न होवो पण मुख्यमंत्री आपल्‍याला नाव घेउन बोलावतात हेच समोरच्याला फार भावते.याबाबतीत यशवंतराव चव्हाण आणि वसंतदादा पाटील यांचीही हातोटी होती.पन्नास वर्षांपूर्वीच्या गोष्‍टीपण ते जसेच्या तसे नावासह सांगायचे.या गुणामुळेच त्‍यांना समाजात स्‍थान मिळाले, असे शरद पवार यांनी नमूद केले.

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -