घरमहाराष्ट्रराज्यात करोनाची बेरीज पण गुणाकार मात्र नाही

राज्यात करोनाची बेरीज पण गुणाकार मात्र नाही

Subscribe

 जगभरात ज्या वेगाने कोरोना विषाणूचा संसर्ग सुरु आहे तो पाहता जगभरात याविषयी काळजी व्यक्त केली जात आहे. मात्र, महाराष्ट्रासह भारतातील स्थिती काहीशी दिलासा देणारी असल्याचे मत राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी व्यक्त केले आहे. राज्यात एकूण 1135 करोना रुग्ण आहेत. एक महत्त्वाचा भाग म्हणजे राज्यात रुग्णांची बेरीज होत आहे, मात्र, गुणाकार होताना दिसत नाही, अशी माहिती राजेश टोपे यांनी दिली. ते पत्रकार परिषदेत राज्यातील कोरोना संसर्गाची आणि नियंत्रणाची माहिती देताना बोलत होते.

राजेश टोपे म्हणाले की, राज्यातील कोरोना रुग्णांचा अद्ययावत आकडा 1135 इतका आहे. आज जवळपास 117 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. काही प्रमाणात जरुर रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील सर्वांना सांगितलं आहे. अमेरिका, इटलीसारख्या अनेक देशांप्रमाणे आपल्याकडेही करोना रुग्णांची वाढ गुणाकाराच्या पद्धतीने होण्याची भीती वाटत होती. या देशांमध्ये 30 व्या दिवशी 1 लाख 21 हजार इतके संसर्ग झालेले रुग्ण आहेत. त्याच्या तुलनेत आपल्या देशात या रुग्णांची संख्या साडेचार ते पावणेपाच हजाराच्या दरम्यान आहे. त्यामुळे तुलनात्मकदृष्ट्या पाहिले तर वेळीच उपाययोजना केल्याने आपल्याकडील संख्या कमी आहे.

- Advertisement -

राज्यात एकही रुग्ण अगदीच असायला नकोत. कुणीही आहे त्या रुग्णांचंही समर्थन करणार नाही. एक जरी रुग्णाची संख्या वाढली तरी ती आपल्या सर्वांच्या दृष्टीकोनातून काळजी करणारी गोष्ट आहे. 35 ते 40 दिवसाच्या काळात रुग्णांच्या आकडेवारीत एक मोठी उसळी पाहायला मिळते. त्यामुळे त्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी पुढील 7 ते 8 दिवस आपले प्रयत्न सुरु राहतील. कोरोना रुग्णांच संख्या वाढते आहे मात्र, काही रुग्णांना उपचारानंतर घरीही सोडलं जात आहे. ही समाधानाची बाब आहे, असंही राजेश टोपे यांनी सांगितलं.

राजेश टोपे म्हणाले, रुग्णालये 3 प्रकारची असतील. ज्यांना गंभीर लक्षणे नाहीत अशा रुग्णांसाठी वेगळी 5 रुग्णालये असतील. गंभीर आणि अतिगंभीर रुग्णांसाठी वेगळे रुग्णालये असतील. बुधवारी आयएमएची बैठक झाली. यात राज्याचे प्रमुख पदाधिकारी आले होते. त्यांनी प्रत्येक तालुक्यात एक रक्षक रुग्णालय सुरु करणार असल्याचे सांगितले. खासगी रुग्णालये पूर्ण योगदान देतील. त्यांच्या सुरक्षेसाठीच्या साहित्याची व्यवस्था करण्यात येईल. आयएमएच्यावतीने मोबाईल हॉस्पिलट देखील चालवेल.

- Advertisement -

रॅपिड टेस्टने कोरोनाचा संसर्ग झाला आहे की नाही याबाबत खात्रीने सांगता येत नाही. त्यामुळे राज्य सरकार याबाबत सावध भूमिका घेत आहे. मात्र, केंद्राच्या सुचनेनुसार आम्ही येणार्‍या काळात त्यावर विचार करु, असं मत राजेश टोपे यांनी व्यक्त केलं.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -