घरताज्या घडामोडीराज्यात यंदा सरासरीपेक्षा अधिक पावसाची नोंद; धरणांमधील पाणीसाठ्यात वाढ

राज्यात यंदा सरासरीपेक्षा अधिक पावसाची नोंद; धरणांमधील पाणीसाठ्यात वाढ

Subscribe

राज्यात परतीच्या पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. राज्यात सरासरीच्या तुलनेत 23 टक्के अधिक पावसाची नोंद झाली. मुंबई शहरासह कोकण विभागात अनेक भागांत सरासरीच्या तुलनेत आणि दरवर्षीपेक्षा कमी पाऊस झाला आहे. राज्याच्या सर्वच विभागांतील धरणांमध्ये यंदा 90 टक्क्यांहून अधिक पाणीसाठा जमा झाला आहे.

राज्यात परतीच्या पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. राज्यात सरासरीच्या तुलनेत 23 टक्के अधिक पावसाची नोंद झाली. मुंबई शहरासह कोकण विभागात अनेक भागांत सरासरीच्या तुलनेत आणि दरवर्षीपेक्षा कमी पाऊस झाला आहे. राज्याच्या सर्वच विभागांतील धरणांमध्ये यंदा 90 टक्क्यांहून अधिक पाणीसाठा जमा झाला आहे. शिवाय, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात सर्वाधिक पाऊस कोसळला आहे. (The state has recorded more than average rainfall this year Increase in water storage in dams)

जुलैच्या अखेरीस राज्यात पावसाने सरासरी पूर्ण करून ती ओलांडली. जुलै आणि ऑगस्ट या 2 महिन्यांत राज्यात सर्वाधिक पावसाची नोंद झाली. या कालावधीत काही भागांत अतिवृष्टीमुळे शेतीचे नुकसानही झाले. गतवर्षी मुंबईसह कोकण विभागात अधिक पाऊस झाला होता.

- Advertisement -

यंदा मुंबई शहरात पावसाची सरासरी पूर्ण झालेली नाही. कोकण विभागात सर्वात कमी सरासरीच्या तुलनेत 9 टक्के पाऊस झाला आहे. विदर्भात सरासरीच्या तुलनेत 31 टक्के अधिक, मध्य महाराष्ट्रात 26 टक्के अधिक पाऊस झाला आहे. मराठवाड्यातही सरासरीपेक्षा 24 टक्के अधिक पावसाची नोंद झाली आहे.

मुसळधार पावासामुळे पुण्यात झाड कोसळून एका रिक्षा चालकाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. पुण्यात पावसाने अचानक जोर धरल्याने अनेक सखल भागात पाणी साचले. शुक्रवारी दुपारी 4 वाजताच्या सुमारास पुण्यात मुसळधार पावसाला सुरुवात झाली. राज्यात परतीच्या पावसाने जोरदार हजेरी लावण्यास सुरूवात केली आहे. मुसळधार पावसाचा पुण्याला चांगलाच फटका बसल्याचे दिसत आहे.

- Advertisement -

हेही वाचा – पुण्यात ‘मुसळधार’, झाड कोसळून रिक्षा चालकाचा मृत्यू

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -