घरCORONA UPDATEआता पुण्यात ऑक्सिजन पुरवणाऱ्या टँकरमध्ये रुग्णवाहिकेसारखे सायरन असणार

आता पुण्यात ऑक्सिजन पुरवणाऱ्या टँकरमध्ये रुग्णवाहिकेसारखे सायरन असणार

Subscribe

जिल्ह्यातील वैद्यकीय सुविधांना ऑक्सिजन पुरवठा करणाऱ्या टँकरना रुग्णवाहिकांचा दर्जा देण्याचे आदेश पुणे जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. त्यानुसार वैद्यकीय सुविधांना ऑक्सिजन पुरवणाऱ्या टँकरमध्ये आता रुग्णवाहिकेसारखे सायरन असतील, अशी माहिती पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाने दिली आहे.

- Advertisement -

राज्यात दिवसेंदिवस कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत आहे. तसेच राज्यातील महत्वाच्या मुंबई, पुणे, औरंगाबाद शहरामध्ये कोरोना रुग्णांचा आकडा वाढताना दिसत आहे. पुण्यात काल दिवसभरात १ हजार ९३८ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. तर पिंपरी-चिंचवडमध्ये १ हजार ३३१ कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. चिंतेची बाब म्हणजे पुण्यातील कोरोनाबाधितांची संख्या दोन लाखाच्या वर गेली आहे. त्यामुळे आता पुणे हा देशातील सर्वाधिक रुग्णसंख्या असलेला पहिला जिल्हा ठरला आहे. महाराष्ट्र सरकार आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार पुणे जिल्ह्यात तब्बल २ लाख ३ हजार ४६८ कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. राज्यात आतापर्यंत ७,१५,०२३ रुग्ण बरे झाले आहेत. तर अजूनही राज्यात २,७१,५६६ इतके Active रूग्ण असल्याची माहिती राज्याच्या आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे.

हेही वाचा –

IPL 2020 मध्ये चीअर लीडर्स दिसणार, पण

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -