घरमहाराष्ट्रनाशिकथेट आमदारांसाठी डोकेदुखी ठरलेल्या 'झेडपी'च्या 'त्या' वादग्रस्त अधिकाऱ्यांची अखेर बदली

थेट आमदारांसाठी डोकेदुखी ठरलेल्या ‘झेडपी’च्या ‘त्या’ वादग्रस्त अधिकाऱ्यांची अखेर बदली

Subscribe

नाशिक : आमदार हिरामण खोसकर यांनी थेट आरोप करत पदमुक्त करण्याची मागणी केलेले, नाशिक जिल्हा परिषदच्या बांधकाम विभागात कार्यकारी अभियंता पदावर रुजू असलेले आणि सतत वादाच्या केंद्रस्थानी राहिलेले सुरेंद्र कंकरेज यांची अखेर बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागी आता अहमदनगर जिल्हा परिषदेचे कार्यकारी अभियंता संदीप सोनवणे यांनी नियुक्ती करण्यात आली आहे.

आ. हिरामण खोसकर यांच्या मतदारसंघातील काही कामे रद्द झाली होती. याबाबत खोसकर यांनी थेट बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता सुरेंद्र कंकरेज यांच्यावर त्याबाबत आरोप केले होते. विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ आणि आ. खोसकर यांनी त्यांना थेट पदमुक्त करावे अशी मागणी केली होती.

- Advertisement -

दरम्यान, आमदार सुहास कांदे यांनी देखील थेट मुख्यमंत्र्यांना पत्र लिहीत अभियंता कंकरेज यांच्या कामकाजा बाबत लेखी तक्रार केली होती. पालकमंत्री दादा भुसे यांनी घेतलेल्या जिल्हा परिषदेच्या आढावा बैठकीत देखील कंकरेज यांच्याबाबत मुद्दा उपस्थित झाला होता. त्यानंतर पालकमंत्री भुसे यांनी तात्काळ या सगळ्या गोष्टीची दखल घेत यांच्या कामाच्या बाबत ज्या तक्रारी होत्या त्याची सखोल चौकशी करण्याचे आदेश दिले होते. तत्पूर्वी तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी बनसोड यांनी केलेल्या तक्रारीवरून देखील कंकरेज यांची विभागीय आयुक्त कार्यालयामार्फत चौकशी सुरूच होती.

या सर्व प्रकारामुळे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी अशीमा मित्तल यांनी सुरेंद्र कंक्रेज यांना सक्तीच्या रजेवर पाठवले होते. त्यांनी पुन्हा कामावर रुजू होण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, पुन्हा रुजू होत नसल्यामुळे अखेर कंकरेज यांनी बदलीसाठी अर्ज केला व तात्काळ त्यांचा अर्ज मान्य करण्यात आला. कंकरेज यांची बदली नगरपरिषद संचालनालय नाशिक या ठिकाणी करण्यात आली आहे  त्यांच्या जागी अहमदनगर जिल्हा परिषदेचे कार्यकारी अभियंता संदीप सोनवणे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -