घरअर्थजगतश्री अन्न योजना! भरडधान्य म्हणजे नक्की काय? उत्पादन वाढीवर सरकारचा जोर का?

श्री अन्न योजना! भरडधान्य म्हणजे नक्की काय? उत्पादन वाढीवर सरकारचा जोर का?

Subscribe

What is Millets | भरडधान्याला जागतिक बाजारपेठ निर्माण करणे, भरडधान्याचे उत्पादन वाढवण्याकरता श्री अन्न योजना (Shree Anna Scheme) केंद्र सरकारने राबवली आहे. हे भरडधान्य म्हणजे नक्की काय? त्याचा वापर काय? त्याचे उत्पादन कसे असते, हे पाहुयात. (Know more about millets)

What is Millets | शरीरासाठी पोषक असलेल्या भरडधान्याला (Millets) पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्याकडून पुन्हा एकदा नवी ओळख देण्याचा प्रयत्न सुरू आहे. देशभरातील विविध आजार दूर पळवण्यासाठी या भरडधान्यांचा वापर केला जाऊ शकतो. पूर्वीच्या काळी भरडधान्यांचा दैनंदिन जीवनात सहज वापर होत असल्याने लोकांचं आयुष्यमान चांगले होते. त्यामुळे आताही हे भरडधान्य रोजच्या आहारात येण्याकरता सरकारकडून पुन्हा एकदा प्रयत्न सुरू झाले आहेत. म्हणूनच, भरडधान्याला जागतिक बाजारपेठ निर्माण करणे, भरडधान्याचे उत्पादन वाढवण्याकरता श्री अन्न योजना (Shree Anna Scheme) केंद्र सरकारने राबवली आहे. हे भरडधान्य म्हणजे नक्की काय? त्याचा वापर काय? त्याचे उत्पादन कसे असते, हे पाहुयात. (Know more about millets)

श्री अन्न योजना (Shree Anna Scheme) 

- Advertisement -

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या मन की बात मध्ये भरडधान्याची माहिती दिली होती. त्यानंतर आज सादर झालेल्या अर्थसंकल्पात मिलेट्ससाठी तरतूद करण्यात आली आहे. मिलेट्स म्हणजे भरडधान्य. भरडधान्याला भारतात श्री अन्न म्हटलं जातं. त्यामुळे या योजनेला श्री अन्न योजना असे नाव देण्यात आले आहे. भविष्यात अन्नटंचाई निर्माण होऊ नये म्हणून भरडधान्याचे उत्पादन वाढवण्यावर केंद्र सरकार भर देणार आहे. यासाठी हैदराबाद येथे मिलेट्ससाठी रिसर्च सेंटर स्थापन करण्यात येणार आहे. यामार्फत भरडधान्यांचे उत्पादन कसे वाढेल यावर संशोधन करण्यात येणार आहे.

भरडधान्य म्हणजे काय? (What is Millets)

- Advertisement -

शेतीसाठी उत्तम असलेले पीक, पाण्याची कमी आवश्यकता असणारे मिलेट हे निसर्गस्नेही पिके आहेत. गहू व तांदूळ सोडून इतर जे धान्य नियमित आपल्या आहारात वापरले जाते त्याला आपण भरडधान्य असे म्हणू शकतो. ज्वारी, बाजरी, नाचणी ही भरडधान्य आपण जसेच्या तसे पीठ करून खाऊ शकतो तर वरई, राळा, बर्टी, कोदो, डेंगळी ही इतर भरडधान्य त्यावरील असलेली साल बाजूला केल्यावर खाण्यायोग्य होतात. जसे तांदळाला साल असते तशीच या बारीक धान्यांना साल आवरण असते. पूर्वी उखळात कांडून किंवा मातीच्या जात्यावर भरडून हे आवरण काढले जाई. आता ते काम मशिनद्वारे केले जाते. अशा साल काढलेल्या भरडधान्यांचा वेगवेगळ्या प्रकारे आहारात वापर केला जातो.

भरडलेले हे धान्य कर्बाबरोबरच प्रथिने, खनिजे, जीवनसत्त्वे आणि तंतुमययुक्त असतात. यातील कर्ब पचावयास हलका असतो म्हणून भरडधान्ये बाल आहारात समाविष्ट केली जातात. पूर्वी आशिया खंडामधील लोकांचे हे पारंपरिक मुख्य अन्न होते. एकूण ११ महत्त्वाच्या भरडधान्यापैकी ९ भरडधान्ये भारतामधील आहेत आणि त्यांना प्रांताप्रमाणे तेथील स्थानिक भौगोलिक परिस्थितीनुसार वेगवेगळी नावे आहे. उदा. कोदो, कुटकी, ज्वारी, सेन्द्री, बाजरी, भगर, कंगनी अथवा राळ, हरी कंगणी, छाना, राजगिरा आदी. ही सर्व भरडधान्ये समृद्ध जंगलाने दिलेली देणगी आहे.

आंतरराष्ट्रीय भरडधान्य वर्ष (International Millets year)

संयुक्त राष्ट्रांकडून २०२३ हे ‘आंतरराष्ट्रीय भरडधान्य वर्ष’ म्हणून साजरे होत आहे. यामध्ये भारताचा मोठा सहभाग आहे. भरडधान्य उत्पादनात भारताचा वाटा आशिया खंडात ८० टक्के तर एकूण जागतिक उत्पादनात २० टक्के आहे.

म्हणून डायबेटीसचा अधिक प्रसार

भरडधान्यांचा वापर आहारात कमी झाल्यामुळेच उच्च रक्तदाब, मधुमेह, हृदयांचे विकार वाढले असल्याचे म्हटले जाते. भारतात सर्वाधिक मधुमेही आहेत. भारतात मधुमेहाचे प्रमाण कमी करण्यासाठीही भरडधान्याचा वापर वाढवण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -