घरक्राइमहजार वर्षांपूर्वींच्या अतिदुर्मिळ नाण्यांचा खजिना होणार खुला

हजार वर्षांपूर्वींच्या अतिदुर्मिळ नाण्यांचा खजिना होणार खुला

Subscribe

’श्रीरामछंद’ घेणार रामाच्या अस्तित्त्वाचा वेध, शनिवारपासून नाणी प्रदर्शन

रामजन्मभूमी अयोध्येमध्ये जानेवारीमध्ये होणार्‍या श्रीराममूर्ती प्रतिष्ठापनेच्या सोहळ्याचे औचित्य साधत प्राचीन श्री काळाराम मंदिर संस्थातर्फे ‘श्रीरामछंद’ या अनोख्या नाणेप्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. १६ आणि १७ डिसेंबर रोजी श्री काळाराम मंदिर संस्थानने श्रीरामछंद या प्राचीन नाणी प्रदर्शनाचे आयोजन केले आहे. तब्बल अडीच हजार वर्षांपूर्वीची अतिदुर्मिळ नाणी प्रभू रामचंद्रांच्या रामराज्य संकल्पनेची अनोखी मांडणी या संकल्पनेतून केली जाणार आहे.

प्राचीन नाणी संग्राहक व अभ्यासक चेतन राजापूरकर यांच्या संग्रहातील तब्बल २ हजार ६०० वर्षे पूर्वीपर्यंतची विविध राजवटींमधील नाणी, पोस्टर, स्टॅम्प्स, प्रभू रामचंद्रांच्या इतिहासावर प्रकाशझोत टाकणारे ऐतिहासिक संदर्भ, पुरातत्त्व विषयाशी निगडीत नकाशे आदी साहित्याचे सादरीकरण पंचवटीतील श्री काळाराम मंदिराच्या आवारात होणार आहे.
प्रदर्शनाचे संग्राहक तथा नाण्यांचे अभ्यासक चेतन राजापूरकर म्हणाले की, काही समाजघटकांनी या देशाची अस्मिता असणार्‍या प्रभू रामचंद्रांच्या अस्तित्त्वावरच शंका घेतली. रामायणाच्या इतिहासाला काल्पनिक म्हणण्यापर्यंतही त्या घटकांची मजल गेली. यातून आलेल्या उद्विग्नतेतून शोध घेतला असता रामराज्याची संकल्पना आपल्या राज्यपद्धतीत आणण्यासाठी परिश्रम घेणारे, निर्णयांची अंमलबजावणी करणारे इतकेच नाही तर श्रीराम पंचायतनाची मुद्रा छापणारे राजे आपल्या राज्यात चलनातील नाण्यांवरही होऊन गेले आहेत, असे अनोखे संदर्भ या नाण्यांवरून सापडले आहेत.

- Advertisement -

ऐतिहासिक नाण्यांचा अभ्यास केला असता या त्यावेळी चलनातील नाण्यांद्वारे रामराज्य या संकल्पनेवर तत्कालीन दिग्गज राजे व राजघराण्यांचा, तत्कालीन जनतेचा असणारा विश्वास अधोरेखित होतो. हीच बाब रामप्रतिष्ठापनेच्या औचित्यावर लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रदर्शनाचे आयोजन केले आहे, असे राजापूरकर यांनी सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -