घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रनिवृत्तीनंतर घरी न जाणार्‍या जवानाचा लॉजमध्ये आढळला मृतदेह

निवृत्तीनंतर घरी न जाणार्‍या जवानाचा लॉजमध्ये आढळला मृतदेह

Subscribe

सैन्यदलातून निवृत्त झाल्यावर घरी न जाता अनेक दिवस नाशिकरोडमधील एका लॉजमध्ये मुक्काम करणार्‍या एका जवानाचा संशयास्पद अवस्थेत मृतदेह आढळून आला आहे. शवविच्छेदन अहवालात या संशयास्पद बाबींचा उलगडा झाला असून, नशिकरोड पोलिसांनी आकस्मिक मृत्यूच्या नोंद करून तपास सुरु केला आहे. कोनाईपल्ली आप्पाराव लेवाराज (वय ४०, रा. काईपल्ली स्ट्रीट, काशीमकोटा, मंडलम, विशाखापट्टनम्, आंध्रप्रदेश) असे मृत जवानाचे नाव आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, कोनाईपल्ली हे भारतीय सैन्यदलात कार्यरत होते. काही दिवसांपूर्वीच ते सेवानिवृत्त झाले. ते नाशिकरोडच्या सहारा लॉजमध्ये भाडेत्वावर रुम बुक करुन वास्तव्य करत होते. परंतु, सोमवारी (दि. ११) ते रुममध्ये बेशुद्धावस्थेत आढळले. त्यानुसार त्यांना बिटको रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी तपासणी करत त्यांना मृत घोषित केले. तेथून मृतदेह जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आला. वैद्यकीय अधिकारी डॉ. श्रावण गायकवाड यांनी सोमवारी (दि.१२) शवविच्छेदन केले असून, कोनाईपल्लींचे यकृत निकामी झाल्याचे आढळून आले. त्यांचा उजवा डोळा निळसर आणि डोक्याच्या मागील बाजूस जखम झाल्याचे आढळले आहे. त्यातून मृत्यू झाल्याचे डॉ. गायकवाड यांनी सांगितले.

  • कोनाईपल्ली हे सैन्य दलाच्या कमांडमध्ये कोणत्या पदावर कार्यरत होते. ते कुटुंबाकडे का गेले नाहीत, याची माहिती उपलब्ध झालेली नाही.
  • मृत जवानास मद्याचे व्यसन असून, त्याच नशेत रुममध्ये पडून त्यांना जखमा झाल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.
  • पोलिसांनी नातलगांशी संपर्क साधला आहे.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -