घरमहाराष्ट्रघटस्फोटाचा अर्ज प्रलंबित असतानाच महिलेने केला दुसरा विवाह

घटस्फोटाचा अर्ज प्रलंबित असतानाच महिलेने केला दुसरा विवाह

Subscribe

एके दिवशी अचानक सीमाला तिच्या आईचा फोन आला व ती माहेरी निघून गेली.

भारतीय कायद्यानुसार पहिल्या पत्नी सोबत किंवा पतीसोबत घटस्फोट झाल्यानंतरच कोणताही व्यक्ती दुसरे लग्न करु शकतो असा कायदा तयार केला आहे. जर पहिला जीवनसाथी असताना एखाद्या व्यक्तीने दुसरे लग्न केले तर दुसरे लग्न अवैध मानले जाते. अशातच कौटुंबिक न्यायालयात घटस्फोटासाठी केलेला दावा मंजूर झाला नसताना एका महिलेने दुसरे लग्न केलं असल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी महिलेच्या पुर्व पतीने हर्षद ज्ञानेश्वर काळे यांनी समर्थ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून. तब्बल सहा जणांवर गुन्ह्यांची नोंद करण्यात आला आहे. महिलेच्या पोलिस भावाने आपल्याच मेव्हण्याला जीवे मारण्याची धमकी दिल्याने हर्षदने पोलिस स्टेशनमध्ये धाव घेत सदर घटनेबाबत पोलिसांना सांगितले आहे.

हर्षद आणि सीमा यांचा विवाह आळंदी येथे 2 डिसेंबर 2019 रोजी झाला होता. दोघेही मंगळवार पेठेत एकत्र राहत होते. पण एके दिवशी अचानक सीमाला तिच्या आईचा फोन आला व ती माहेरी निघून गेली. यानंतर हर्षदने अनेकदा तिला व तिच्या घरच्यांना सीमाला परत पाठवण्याची विनंती केली.पण सीमाच्या भावाने हर्षदला फोनवर धमकी देत शिवीगाळ करण्यास सुरूवात केली. त्यानंतर सीमाने घटस्फोटाची तयारी करत हर्षदला सही करण्यास दबाव देत माझा भाऊ मोठा भाई आहे आशी धमकी दिली . तसेच 20 जानेवारी 2021 रोजी हर्षदला कोर्टात विषाची बाटलीचा धाक दाखवत जबरदस्तीने कागदपत्रावर सही करण्यास भाग पाडले.
कौटुंबिक न्यायाल्याने घटस्फोटाच्या आदेशाकरिता सहा महिन्यांचा बंधनकारक कालवधीनंतरची तारीख नेमून सल्लागार सक्षम अर्ज पाठविला. यानंतर घटस्फोट झाला नसताना तसेच घटस्फोटाचा अर्ज प्रलंबित असताना सीमाने या पुर्वीच दुसरा विवाह केल्याने न्यायालयाच्या आदेशानुसार समर्थ पोलिसांनी सीमा विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

- Advertisement -

हे हि वाचा –‘अंनिस’ने चार वर्षांत रोखले २३५ बालविवाह

Mukta Londhe
Mukta Londhehttps://www.mymahanagar.com/author/mukta/
गेली दोन वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, रिपोर्टींग आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -