घरमहाराष्ट्रपुण्यात २३ जुलैनंतर लॉकडाऊन नाही; जिल्हाधिकाऱ्यांनी दिली ग्वाही

पुण्यात २३ जुलैनंतर लॉकडाऊन नाही; जिल्हाधिकाऱ्यांनी दिली ग्वाही

Subscribe

मात्र, पुढील काळात आजपर्यंत शासनाने दिलेल्या आदेशाचं पालन नागरिकांना करावं लागणार

पुण्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसागणिक वाढत आहे. या पार्श्वभूमीवर पुणे शहर आणि पिंपरी-चिंचवड शहर दिवसांसाठी लॉकडाऊन करण्यात आलं आहे. आज सोमवारी लॉकडाऊनचा सातवा दिवस आहे. यानंतर २३ जुलैपासून पुणे जिल्ह्यात लॉकडाऊन नसेल, अशी सूचक माहिती जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांनी दिली आहे. यामुळे पुणेकरांना थोडासा दिलासा मिळेल.

पुण्याचे जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांनी माध्यमांशी संवाद साधला. कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता १० दिवसांचा लॉकडाऊन जाहीर करण्यात आला. मात्र, या काळात नागरिकांनी प्रशासनाला चांगलं सहकार्य केलं. त्यामुळे या लॉकडाऊननंतर पुन्हा लॉकडाऊन असणार नाही, असं सोमवारी माध्यमांशी बोलताना जिल्हाधिकारी राम म्हणाले. मात्र, या पुढील काळात देखील आजपर्यंत शासनाने दिलेल्या आदेशाचं पालन नागरिकांना करावं लागेल, असं देखील जिल्हाधिकारी म्हणाले.

- Advertisement -

पुण्यातील रुग्णसंख्या लवकरच नियंत्रणात येईल – जिल्हाधिकारी

पुण्यात कोरोनाचा पहिला रुग्ण आढळल्यापासून आज पर्यंत प्रशासनाकडून कोरोनाबाधितांचा आकडा नियंत्रणात आणण्याच्या दृष्टीने विशेष उपाय योजना करण्यात येत आहेत. कोरोना चाचण्या देखील वाढवण्यात आल्या आहेत. त्यामुळे दररोज रुग्णांची संख्या वाढत आहे. मात्र, रुग्ण संख्या वाढत आहे म्हणून नागरिकांनी घाबरून जाऊ नये. पुढे येऊन उपचार घ्यावेत. कोणत्याही रुग्णाला बेड कमी पडू देणार नाही, असं आश्वासन जिल्हाधिकाऱ्यांनी दिलं. सध्याची परिस्थिती लक्षात घेता, शहरी भाग आणि त्यानंतर ग्रामीण भागातील रुग्ण संख्या नियंत्रणात येण्यास मदत होईल असा अंदाज देखील जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी व्यक्त केला.


हेही वाचा – पालकांनो आता तुम्हीच सांगा शाळा कधी उघडायच्या; सरकार मागतंय फीडबॅक

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -