घरमहाराष्ट्रम्हातारी मेल्याचे दुःख नाही पण..., नागपूरच्या 'त्या' घटनेवरून रोहित पवारांचे पोलिसांना आवाहन

म्हातारी मेल्याचे दुःख नाही पण…, नागपूरच्या ‘त्या’ घटनेवरून रोहित पवारांचे पोलिसांना आवाहन

Subscribe

मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या देवगिरी निवासस्थानाबाहेर एका पोलीस अधिकाऱ्याला धक्काबुक्की केली गेली आहे, असा दावा ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. त्यांनी तसा एक व्हिडीओही ट्वीट केला आहे. त्याचसंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी संताप व्यक्त करत, पोलिसांना कारवाई करण्याचे आवाहन केले आहे.

हेही वाचा – कोणाला वाचवताय? ‘त्या’ व्हिडीओवरून राऊत संतापले; म्हणाले, कमळ लावलं आणि…

- Advertisement -

उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूर येथील देवगिरी निवास्थानाबाहेर पोलीस उपआयुक्त राहुल मदने यांना भाजप युवा शहरप्रमुख पुष्कर पोशेट्टीव यांनी धक्काबुक्की केली, तसेच, पोलिसांच्या कॉलरला हात घातल्याचा आरोप ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. हे चित्र महाराष्ट्राची दुर्दशा दाखवणारे आहे. महाराष्ट्र इतका हतबल आणि लाचार कधीच नव्हता, असेही त्यांनी म्हटले आहे.

- Advertisement -

यावरून आता तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी यासंदर्भात ट्वीट केले आहे. महाराष्ट्र पोलीस दल म्हणजे देशात नावलौकिक असलेले पोलीस दल आहे. महाराष्ट्र पोलीस दलाने कोविड काळात स्वतःच्या जीवाची पर्वा न करता रात्रंदिवस लोकांची सेवा केली. त्याच पोलीस दलातील वर्दीत असलेल्या उपआयुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यावर नागपूरमध्ये खुद्द गृहमंत्र्यांच्या घरासमोरच हात उचलण्यापर्यंत भाजपा कार्यकर्त्याची मजल जात असेल तर ही सत्तेची धुंदी आणि पोलिसांना आपले खासगी कामगार असल्याप्रमाणे वागवण्याचा अत्यंत हीन आणि संतापजनक प्रकार आहे, अशा शब्दांत त्यांनी संताप व्यक्त केला आहे.

हेही वाचा – भाजप अधिकाऱ्याकडून पोलिसाला धक्काबुक्की; राऊत म्हणाले, महाराष्ट्र इतका हतबल…

दुसऱ्या राज्यातील निवडणुकीत राजकीय फायदा उठवण्यासाठी सुशांतसिंह प्रकरणातही महाराष्ट्र पोलिसांची नाहक बदनामी करण्याचा भाजपाच्या लोकांनी असाच जाणीवपूर्वक प्रयत्न केला होता. त्यामुळे ‘म्हातारी मेल्याचे दुःख नाही, पण काळ सोकावता कामा नये’, यासाठी आणि महाराष्ट्र पोलिसांची प्रतिष्ठा आणि सन्मान कायम राखण्यासाठी पोलिसांनी राजकीय दबाव झुगारून या प्रकरणी संबंधितांवर कठोर कायदेशीर कारवाई करावी, असे आवाहन त्यांनी केले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -