घरमहाराष्ट्र"अजित पवारांनी प्रकल्पांचा आढावा घेण्यात गैर काही नाही", सुनील तटकरेकडून स्पष्टीकरण

“अजित पवारांनी प्रकल्पांचा आढावा घेण्यात गैर काही नाही”, सुनील तटकरेकडून स्पष्टीकरण

Subscribe

मुंबई : “अजित पवार प्रकल्पांचा आढावा घेण्यात गैर काही नाही. प्रकल्पांचा आढावा घेणे म्हणजे ‘कोल्ड वॉर’ नाही”, असे स्पष्टीकरण अजित पवार गटाचे खासदार सुनील तटकरे (Sunil Tatkare) यांनी माध्यमांना दिले. मंत्रालयात काल अजित पवारांनी मुख्यमंत्र्यांच्या वॉररुममधून राज्यातील प्रकल्पांचा आढवा घेतला आहे आणि आता मुख्यमंत्री आणि अजित पवार यांच्या कोल्ड वॉर सुरू आहे, असा दावा विधानसभेचे विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी केला आहे. राज्यातील जनतेचे प्रश्न सोडविणे हेच वॉर आमच्या सर्वांसमोर आहे, अशी प्रतिक्रिया सुनील तटकरेंनी केली आहे.

विजय वडेट्टीवार यांच्या आरोपावर सुनील तटकरे म्हणाले, “अजित दादांच्या कामाची विशिष्ट पद्धत राहिलेली आहे. अजित पवारांकडे अर्थ आणि नियोजन विभाग असल्यामुळे राज्यात प्राधान्याने असलेले जे प्रकल्प आहेत. हे प्रकल्प मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांच्या देखील सुचीमधील प्राधान्यांचे प्रकल्प आहेत. अशा वेळी त्याचा आढावा घेणे आणि त्यात किती, काय तरतूद आहे. याचा आढावा घेणे यात काही गैर काय? यामुळे कोणतेही कोल्ड वॉर नाही. वॉररुमच्या माध्यमातून जनतेचे प्रश्न गतीमान पद्धतीने सोडविणे, हेच वॉर आमच्या सर्वांच्यासोबत आहे.”

- Advertisement -

मुख्यमंत्री-अजित पवारांमध्ये कोल्ड वॉर सुरु

विजय वडेट्टीवार म्हणाले, “काल आम्ही पाहिले की, खात्याचा संबंध नसताना. जे वित्त विभागाचे मंत्री आहेत. त्यांनी मुख्यमंत्र्यांची वॉररुममध्ये राज्यातील प्रकल्पाबाबत आढावा घेतला. यामध्ये मुख्यमंत्री अध्यक्ष असतात. याचा अर्थ विभागाशी काही संबंध नसतो. म्हणजे वॉररुमध्ये कॉल्ड वॉर सुरू झाले आहे. आणि हा कोल्ड वॉर कोणत्या दिशेने जाईल. हे कालच्या बैठकीतून दिसला असेल.

हेही वाचा – ‘अधिकारांवरून मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांमध्ये कोल्ड वॉर’; विजय वडेट्टीवारांची टीका

- Advertisement -

राष्ट्रवादी काँग्रसेच्या कार्यालयाच्या ताब्यावर म्हणाले

राष्ट्रवादीत दोन गट पडल्यानंतर धुळ्यात वाद निर्माण झाला, असा प्रश्न पत्रकारांनी सुनील तटकरेंना विचारल्यावर ते म्हणाले, “आम्ही भूमिका घेतल्यानंतर कुठे ही वाद विवाद झालेला नाही. धुळ्यातील सहकारी मुंबईत आले आहेत. काल त्यांच्यासोबत बैठक झाली आणि आजही बैठक होणार आहे. यासंदर्भाती निर्णय घेणार आहोत. कधी कोणत्याही कार्यालयावर दावा करण्याचा विषय आमच्यासमोर नाही.”

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -