घरमहाराष्ट्रMaharashtra Monsoon: रविवारपासून राज्यात पावसाचा जोर वाढणार

Maharashtra Monsoon: रविवारपासून राज्यात पावसाचा जोर वाढणार

Subscribe

महाराष्ट्र राज्यात येत्या 4 ते 5 दिवसात काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

राज्यात गेल्या काही दिवसापासून विश्रांती घेतलेला पाऊस पुन्हा एकदा दाखल होणार (Maharashtra Monsoon) असल्याचा इशार हवामान खात्याने दिला आहे. राज्यात उद्यापासून(29 ऑगस्ट) मुसळधार पावसाचा इशारा हवामान खत्याकडून देण्यात आला आहे. पुढील चार दिवस वदर्भ, मराठवाडा ,मध्य महाराष्ट्र आणि कोकणात  मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तसेच उत्तर महाराष्ट्र,उत्तर कोकण,मुंबई,ठाण्यात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. येत्या 30 ऑगस्टला विदर्भ आणि मराठवाड्यात अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. (there is possibility of heavy rains in Maharashtra)

- Advertisement -

बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्याने पश्चिम व मध्य भारतात क्षेत्रात प्रवासाच्या शक्यतेमुळे महाराष्ट्र राज्यात येत्या 4 ते 5 दिवसात काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. सध्या मुंबई,ठाण्यासह राज्यातील इतर भागात पावसाने काही दिवसापासून विश्रांती घेलती असून उद्यापासून पुढील काही दिवस पवसाची हजेरी लागणार आहे. काही दिवसापासून अपेक्षे प्रमाणे पाऊस पडत नव्हाता. यामुळे उन्हाची झळ लोकांना सहन करावी लागत होती. मुंबई महाविभागाचे उपमहासंचालाक के.एस होसाळीकर यांनी ट्विटरच्या माध्यामातून राज्यातील हवामानी माहिती दिली आहे.


हे हि वाचा – शिवाजी महारांजावरील संरक्षण मंत्र्यांचे ‘ते’ विधान चुकीच्या एकीव माहितीवर, खासदार अमोल कोल्हेंचा संताप

Mukta Londhe
Mukta Londhehttps://www.mymahanagar.com/author/mukta/
गेली दोन वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, रिपोर्टींग आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -