घरदेश-विदेशGDP घसरला, बेरोजगारीनेही गाठला ४५ वर्षांतला निच्चांक

GDP घसरला, बेरोजगारीनेही गाठला ४५ वर्षांतला निच्चांक

Subscribe

नव्या सरकारचा शपथविधी होऊन अवघा एक दिवस झाला आहे. त्यातच सरकारसाठी एक वाईट बातमी येत आहे. वर्षाला दोन कोटी रोजगार निर्माण करु, असे आश्वासन देऊन २०१४ साली भाजप पक्ष सत्तेत आला होता. मात्र केंद्रीय सांख्यिकी मंत्रालयाने आज जाहीर केलेल्या अहवालानुसार वर्ष २०१७-१८ बेरोजगारीचा दर ६.१ टक्क्यावर असून मागच्या ४५ वर्षांतील ही टक्केवारी सर्वाधिक असल्याचे सत्य समोर आले आहे.

- Advertisement -

तसेच सांख्यिकी मंत्रालयाने दिलेल्या अहवालानुसार देशाच्या सकल उत्पन्नात म्हणजेच GDP मध्येही मागच्या पाच वर्षात ६ टक्क्यांपेक्षा खाली घसरला असल्याचे समोर आले आहे. वर्ष २०१८-१९ च्या चौथ्या तिमाही मध्ये जीडीपी घसरून ५.८ टक्क्यावर आला. वर्ष २०१८-१९ ची राजकोषीय तूट ३.३९ टक्के आहे, अर्थसंकल्पाने प्रस्तावित केलेली तूट ३.४० होती त्यापेक्षा ही तूट कमी आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -