घरमहाराष्ट्रमतांच्या राजकारणासाठी 'ते' दहशतवाद्यांचं समर्थन करतायेत; बावनकुळेंची शरद पवारांवर टीका

मतांच्या राजकारणासाठी ‘ते’ दहशतवाद्यांचं समर्थन करतायेत; बावनकुळेंची शरद पवारांवर टीका

Subscribe

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी इस्रायल पॅलेस्टाईन वादावर भाष्य केले होते. त्यांच्या त्या विधानाचा आता भाजपकडून कडाडून विरोध केल्या जात आहे.

मुंबई : तिकडे सातासमुद्रापार इस्रायल पॅलेस्टाईनमध्ये युद्ध सुरू आहे. परंतू या युद्धाचे परिणाम थेट आपल्या देशात उमटत असल्याचे दिसून येत आहेत. शरद पवारांनी केलेल्या वक्तव्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिल्यानंतर आता भाजप महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनीसुद्धा शरद पवारांवर टीका केली आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील राजकारण तापल्याचे दिसून येत आहे. (They support terrorists for vote politics Bawankules criticism of Sharad Pawar)

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी इस्रायल पॅलेस्टाईन वादावर भाष्य केले होते. त्यांच्या त्या विधानाचा आता भाजपकडून कडाडून विरोध केल्या जात आहे. आधी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केवळ मतांच्या राजकारणाचा विचार करु नका, तर दहशतवादाचा तीव्र शब्दात धिक्कार करा असा विनंतीपर खोचक सल्ला फडणवीसांनी दिल्यानंतर भाजप महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनीही या वादात उडी घेतली आहे. बावनकुळेंनी शरद पवारांना प्रत्युत्तर देताना, मतांच्या राजकारणासाठी ते दहशतवाद्यांचं समर्थन करत असल्याची बोचरी टीका केली आहे.

- Advertisement -

हेही वाचा : ‘वेगळे झालो म्हणून काय झाले, मैत्री कायम राहणार’; भाजपबद्दल INDIA आघाडीतील नत्याचे वक्तव्य!

पंतप्रधानांनी इस्रायलचे केले समर्थन

इस्रायल-हमास युद्धात भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इस्रायलला पाठिंबा दर्शविला आहे. नरेंद्र मोदींनी इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्याशी फोनवर बोलून भारत इस्रायलच्या बाजूने खंबीरपणे उभा आहे, असा संदेश दिला आहे. परंतु, देशातील काही संघटना आणि विरोधी पक्षांनी पॅलेस्टाईनची बाजू घेतली आहे.

- Advertisement -

हेही वाचा : तुष्टीकरण सोडून देश प्रथम ही भूमिका घेणार का? नारायण राणेंचा शरद पवारांना सवाल

काय म्हणाले होते शरद पवार?

इस्रायल-हमास संदर्भात बोलताना राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार म्हणाले होते की, ज्या भागात युद्ध सुरू आहे ती जमीन ही पॅलेस्टिनी लोकांची आहे. तिथं अतिक्रमण झालं आणि इस्रायल देश उदयाला आला. मला त्याच्या खोलात जायचं नाही. परंतु, भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरूंपासून, इंदिरा गांधी, राजीव गांधी आणि अटल बिहारी वाजपेयी या सर्वांची पॅलेस्टाईनला मदत करण्याची भूमिका होती. दुर्दैवाने आपल्या देशाच्या पंतप्रधानांनी इस्रायलची बाजू घेतली. ते करत असताना त्या जमिनीचे मूळ मालक असलेल्या पॅलेस्टाईनकडे त्यांनी दुर्लक्ष केलं आहे. त्यांची भूमिका काहीही असो, परंतु, आपली म्हणजेच राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका स्वच्छ असली पाहिजे असं वक्तव्य त्यांनी केले होते. त्यानंतर वाद समोर आला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -