घरमहाराष्ट्रचोराचा होरपळून मृत्यू

चोराचा होरपळून मृत्यू

Subscribe

विद्युत डीपी ला लागलेल्या आगीत एकाचा होरपळून मृत्यू झाला होता. हा इसम या ठिकाणी कॉपरच्या पट्ट्या चोरण्यासाठी आला असल्याचा संक्षय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

रविवारी दुपारी पाऊने एकच्या सुमारास विद्युत डीपी ला लागलेल्या आगीत एकाचा होरपळून मृत्यू झाला होता. अद्याप त्या व्यक्तीचे नाव समजू शकलेले नाही. परंतु,अज्ञात व्यक्ती हा डीपी मधील तांब्याच्या कॉपर च्या पट्ट्या चोरण्यासाठी गेला असावा असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे स्वतः चोरी करत असताना झालेल्या अपघातात त्याचा मृत्यू झाला असल्याचे सांगितले जात आहे. याप्रकरणी अधिक तपास वाकड पोलीस करत आहेत.

अचानक आग लागल्याने अग्नीशमन दलाला दिली माहिती

सविस्तर माहिती अशी की,काळेवाडी येथे रविवारी दुपारी अचानक विद्युत डीपीला आग लागल्याची माहिती अग्निशमन दलाला देण्यात आली, तातडीने घटनास्थळी येऊन आग विझवण्यात अग्निशमन दलाला यश आले.मात्र विद्युत डीपी मध्ये एक व्यक्ती होरपळून तिथेच पडला असल्याचे निदर्शनास आले.दरम्यान,हा अज्ञात व्यक्ती कोण आहे याची माहिती अद्यापही मिळाली नाही.मात्र तो चोर असावा असा संशय वाकड पोलिसांनी व्यक्त केला आहे.त्या ठिकाणी तो कॉपर च्या पट्ट्या चोरायचा गेला असावा त्यात त्या विद्युत डीपीची क्षमता ही २२ हजार होल्ट ची होती.ते त्याच्या लक्षात आले नाही.त्याने तिथूनच विद्युत पुरवठा खंडित करत कॉपर च्या पट्ट्याना हात घातला आणि यातच स्फोट होऊन त्याचा होरपळून मृत्यू झाला आहे. सामान्य डीपीमधून कॉपर च्या पट्ट्या काढता येतात. त्यामुळे त्याने थेट हात घातला असावा असं सांगण्यात येत आहे. कॉपर तांब्याच्या पट्ट्यांची किंमत ही ४०० किलो आहे. या घटनेचा अधिक तपास वाकड पोलीस करत आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -