घरदेश-विदेशबुल्ली बाई अॅप प्रकरणात तिसरी अटक; मयांक रावलला पुणे पोलिसांच्या बेड्या

बुल्ली बाई अॅप प्रकरणात तिसरी अटक; मयांक रावलला पुणे पोलिसांच्या बेड्या

Subscribe

गेल्या काही दिवसांपासून बुल्ली बाई आणि सुल्ली डील या अॅपवर मुस्लीम महिलांचे फोटो टाकून त्यांची बोली लावली जात असल्याचा किळसवाणा प्रकार समोर आलाय. त्यानंतर सगळीकडेच याची चर्चा सुरू झालीय. या प्रकरणी बंगळुरु येथून 21 वर्षीय इंजिनीअर तरुणाला मुंबई पोलिसांनी अटक केलीय.

मुंबईः बुल्ली बाई या वादग्रस्त अॅप प्रकरणात मुंबई पोलिसांच्या सायबर सेलने बंगळुरू येथून विशाल कुमार झा आणि उत्तराखंड येथून श्वेता सिंग या तरुणीला अटक केलीय. दरम्यान या प्रकरणात आणखी एका तरुणाला अटक करण्यात आली आहे. मयांक रावल अटक करण्यात आलेल्या तिसऱ्या आरोपीचे नाव आहे. विशेष म्हणजे मुंबई सायबर पोलिसांच्या तीन सदस्यीय पथकाने ही अटकेची कारवाई केलीय.

गेल्या काही दिवसांपासून बुल्ली बाई आणि सुल्ली डील या अॅपवर मुस्लीम महिलांचे फोटो टाकून त्यांची बोली लावली जात असल्याचा किळसवाणा प्रकार समोर आलाय. त्यानंतर सगळीकडेच याची चर्चा सुरू झालीय. या प्रकरणी बंगळुरु येथून 21 वर्षीय इंजिनीअर तरुणाला मुंबई पोलिसांनी अटक केलीय. या प्रकरणात 18 वर्षाची श्वेता सिंग या तरुणीचे नाव आता समोर आलेय. विशेष म्हणजे हीच तरुणी बुल्ली बाई अॅप प्रकरणात मास्टरमाईंड असल्याचा पोलिसांना संशय आहे.
तरुणीने तिचा सोशल मीडियावर एक मित्र असल्याचे सांगितले. हा मित्र मूळचा नेपाळ येथील असून त्याच्याकडून तिला वेगवेगळ्या सूचना दिल्या जायच्या. या तरुणाचे नाव जीयू (Giyou) असल्याची माहिती उत्तराखंड पोलिसांनी दिलीय. तसेच बुल्ली बाई अॅपवर अपलोड होणारे कन्टेंट नंतर तिने सुरू केलेल्या ट्विटरच्या फेक अकाऊंटवर टाकण्याचे तिला सांगण्यात आले होते, असे पोलिसांनी सांगितले.

- Advertisement -

बुल्ली बाई अॅपमध्ये ही तरुणी मास्टरमाईंड?

खरं तर पोलिसांनी श्वेता सिंग या 18 वर्षीय तरुणीला अटक केलं होतं. ही तरुणी नुकतीच बारावी पास झाली होती. विशेष म्हणजे ती इंजिनिअर प्रवेश परीक्षेची तयारी करत आहे. तिला पोलिसांनी उत्तराखंड येथील उधमसिंह नगर जिल्ह्यातून अटक केलंय. मुंबई पोलिसांनी बंगळुरु येथून अटक केलेल्या 21 वर्षीय तरुणाच्या चौकशीतून पोलिसांना या तरुणीची माहिती मिळाली. त्याआधारे पोलिसांनी मुलीला ताब्यात घेतलं आहे. पोलीस या मुलीची अधिक चौकशी करत असल्याचीह माहिती मिळालीय.

Vaibhav Desai
Vaibhav Desaihttps://www.mymahanagar.com/author/vaibhavr/
गेल्या 14 वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत; प्रिंट मीडिया चार वर्षे अनुभव, डिजिटल माध्यमाचा साडेनऊ वर्षांचा अनुभव आहे. तसेच अर्थकारण विषयावर लिखाणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -