घरमहाराष्ट्रहे लहान मैदान, आपल्याला लवकरच मोठ्या मैदानात खेळावं लागणार, संजय राऊतांचा सूचक...

हे लहान मैदान, आपल्याला लवकरच मोठ्या मैदानात खेळावं लागणार, संजय राऊतांचा सूचक इशारा

Subscribe

माझा क्रिकेटशी संबंध नसतानाही मला बोलावलं आहे. हे लहान मैदान आहे आपल्याला लवकरच मोठ्या मैदानात खेळावं लागणार आहे. ते मैदान आपल्याला जिंकायचं आहे.

नाशिकः माझा क्रिकेटशी संबंध नसतानाही मला बोलावलं आहे. हे लहान मैदान आहे आपल्याला लवकरच मोठ्या मैदानात खेळावं लागणार आहे, असा सूचक इशारा शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी दिला आहे. शिवसेना नेते खासदार संजय राऊत हे 2 दिवसीय नाशिक दौऱ्यावर आहेत. नाशिकच्या गोल्फ क्लब मैदानाला त्यांनी भेट दिली, त्यावेळी ते बोलत होते.

माझा क्रिकेटशी संबंध नसतानाही मला बोलावलं आहे. हे लहान मैदान आहे आपल्याला लवकरच मोठ्या मैदानात खेळावं लागणार आहे. ते मैदान आपल्याला जिंकायचं आहे. त्या मैदानासाठी या मैदानातील पोरं फार महत्त्वाची आहेत. ही जी सगळी मुलं आहेत तीच आपली शिवसेनेची प्रिय आहेत. शेवटी खेळाच्या माध्यमातून तरुणांना प्रेरणा मिळत असते. ती राजकारणातून नष्ट होताना दिसतेय. दोन बॉल मलाही मारता आले, नाही तर आम्ही कधी बॅट हातात धरणार, अशीच फटकेबाजी तुम्हीही चालू ठेवा, असा सल्लाही त्यांनी उपस्थित शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना दिला आहे.

- Advertisement -

शिंदे गटानं बंडखोरी केल्यानंतर नाशिकमध्येही उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला मोठं खिंडार पडलं होतं. हे पडलेलं खिंडार भरून काढण्यासाठी आता संजय राऊत मैदानात उतरले आहेत. नाशिकच्या संपर्क प्रमुखांसह माजी आमदार, 12 माजी नगरसेवक, पदाधिकारी यांनी शिंदे गटात प्रवेश केलाय. त्यामुळे उद्धव ठाकरेंची शिवसेना जागी झाली असून, त्यांनी रणनीती आखण्यास सुरुवात केलीय. कधी काळी नाशिक हा शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जात होता. परंतु आता ठाकरे गटातील काही पदाधिकारीही शिंदे गटात जाणार असल्याची चर्चा आहे. त्याच पार्श्वभूमीवर संजय राऊत नाशिकच्या दोन दिवसीय दौऱ्यावर असून, नाशिकमध्ये गोल्फ क्लब मैदानावर उद्धव ठाकरेंचीही सभाही होणार आहे. खरं तर शिंदे गटात जाणारे सगळे पदाधिकारी हे संजय राऊतांच्या जवळचे होते. नाशिक महापालिकेचे 12 माजी नगरसेवक आणि त्यांची शेकडो कार्यकर्ते तसेच उत्तर महाराष्ट्र सहसंपर्कप्रमुखपदाची जबाबदारी सांभाळणारे आणि संजय राऊत यांचे निकटवर्तीय समजले जाणारे भाऊसाहेब चौधरी आणि जिल्हाप्रमुख सुनील पाटील यांनी शिंदे गटात प्रवेश केलाय.


हेही वाचाः …तर रश्मी ठाकरे आणि उद्धव ठाकरे संजय राऊतांना चपलेनं मारतील; राणेंचा नवा वाद

Vaibhav Desai
Vaibhav Desaihttps://www.mymahanagar.com/author/vaibhavr/
गेल्या 14 वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत; प्रिंट मीडिया चार वर्षे अनुभव, डिजिटल माध्यमाचा साडेनऊ वर्षांचा अनुभव आहे. तसेच अर्थकारण विषयावर लिखाणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -