घरमहाराष्ट्र...तर रश्मी ठाकरे आणि उद्धव ठाकरे संजय राऊतांना चपलेनं मारतील; राणेंचा नवा...

…तर रश्मी ठाकरे आणि उद्धव ठाकरे संजय राऊतांना चपलेनं मारतील; राणेंचा नवा वाद

Subscribe

शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) खासदार संजय राऊत आणि केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते नारायण राणे यांच्यातील शाब्दिक वाद आता विकोपाला पोहचत आहे, दोघांकडून सातत्यावे एकमेकांवर आरोप प्रत्योरोप तर कधी चॅलेंज दिले जात आहे. मात्र या वादात मंत्री नारायण राणे यांनी संजय राऊतांचा एकेरी उल्लेख करत एक धक्कादायक विधान केले आहे. यासोबत त्यांना राऊतांना राजकारणातील जोकर म्हणत सडकून टीका केली आहे.

राऊतांना नाही जर चपलेनं मारलं तर मला सांगा

एका ना एक दिवस मी उद्धव ठाकरेंना भेटणार. मी खासदार झाल्यानंतर संजय राऊत राज्यसभेत माझ्या बाजूला येऊन बसायचे आणि उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरेंबद्दल जे काही सांगायचे ते मी उद्धव ठाकरेंना भेटून सांगणार आहे. मी हे सांगितल्यानंतर रश्मी ठाकरे आणि उद्धव ठाकरेंनी त्यांना नाही जर चपलेनं मारलं तर मला सांगा, असं धक्कादायक विधान नारायण राणे यांनी केलं आहे.

- Advertisement -

एक ना एक दिवस मी संरक्षण सोडून संजय राऊतांच्या समोर जाणार

दरम्यान संजय राऊतांनी सुरक्षेशिवाय फिरून दाखवण्याचं दिलेलं आव्हान नारायण राणे यांनी स्वीकारत म्हटले की, राऊतांना उत्तर द्यायचं ते मी देणार, तुमची इच्छा असेल तर असा आता एकटा जाईन मी, मला काही फरक पडत नाही, संरक्षण सोडून मी संजय राऊत जिथे बोलतील तिथे जायला तयार आहे, पण एक ना एक दिवस मी संरक्षण सोडून संजय राऊतांच्या समोर जाणार, असं आव्हान आता राणेंनी राऊतांना दिलं आहे.

राऊतांनी शिवसेना संपवण्याची सुपारी घेतली, पक्ष संपवल्याचा त्यांना आनंद 

मंत्री नारायण राणे पुढे म्हणाले की, 19 जून 1966 पासून शिवसेना वाढवण्यासाठी नारायण राणे शिवसेनेत होते. मी शिवसेना संपवण्याची सुपारी नाही घेतली, संजय राऊतांनी ती सुपारी घेतली आहे. आज राऊतांना होत असलेला आनंद हा शिवसेना संपवल्याचा आहे. 56 आमदार होते आता 12 पण राहिले नाही, तो शेवट करण्यासाठी ते तयार आहेत, असा आरोपही राणेंनी केला.

- Advertisement -

राऊतांच एकतरी विधायक, सामाजिक, विकासात्मक, धार्मिक कार्य सांगा

राऊत कोणाला चॅलेंज देत आहेत? संजय राऊतांच एकतरी विधायक, सामाजिक, विकासात्मक, धार्मिक कार्य सांगा. संपादक म्हणून बौद्धिक, विकासात्मक लिहिलेला लेख दाखवा. पत्रकार म्हणून काय पावित्र्य असतं, आचारसंहिता असते, ती न बाळगता चॅलेंज देतात, एकटा फिरा. मला संरक्षण मी मागितलेलं नाही. ९० सालापासून राजकारणात आहे मी ज्यांच्याविरोधात लढलो ज्यात देशातले कुठले नाही तर बाहेरचे लोकं होते, पोलिसांनी माझ्यावर हल्ला करताना त्यांना अटक केली. त्यावेळी ९० साली मला पोलिसांनी जबरदस्तीने मला संरक्षण दिले, हे संजय राऊतांना माहित नाही, ते शिवसेनेत नव्हते. शिवसेना नव्हता त्यावेळी शिवसेनेविरुध्द लोकप्रभामध्ये लेख लिहिल होते, अशी टीकाही नारायण राणेंनी केली आहे.

सकाळी उठल्यापासून एकचं काम टीका. शिवसेनेचे आत्ताचे नेते उद्धव ठाकरे असो, संजय राऊत कोणी असो, काय लोकांच्या हिताचं बोलतात. अडीच वर्षात केलेलं काम त्यांनी सांगावं. कोणत्या क्षेत्रात काम केलं, राज्याचा जीडीपी किती वाढवला? तो कळतो का आधी विचारा, पर कॅपिटल इनकम, दरडोई उत्पन्न वाढवला का विचारा? असा खोचक सवालही राणे यांनी उपस्थित केला आहे.

संजय राऊत आजच्या राजकारणातील जोकर

आजच्या राजकारणातील संजय राऊत जोकर आहेत. विधायक, सामाजिक, विकासात्मक, धार्मिक काही काम त्यांच्याकडे नाही. जे लेख लिहितात ते शिव्या घालण्यापलीकडे काही नाहीत, अशी जहरी टीकाही नारायण राणेंनी केली आहे.

राऊत मातोश्रीला सुरुंग लावणारे विष, ते एक विषारी प्राणी

मी राज्याचा केंद्रीय मंत्री आहे माझ्याअंतर्गत सहा कोटी तीस लाख उद्योजक उद्योगपती आहेत. मी अख्ख्या राज्यात फिरतो आणि रोजगार, उद्योग वाढवण्याचं काम करतो. हा उद्योग संजय राऊतांकडे नाही, राऊत शिवसेना वाढवणारे नाहीत तर संपवणारे आहेत. ते मातोश्रीला सुरुंग लावणारे ते विष आहेत. ते ज्य़ाच्या खांद्यावर हात टाकतील त्याचा खांदा गळलाच समजा, असा हा विषारी प्राणी आहे. माझा इतिहास शिवसेना घडवण्यामध्ये आहे, शिवसेना संपवण्याचा नाही, असा हल्लाबोल नारायण राणेंनी केला आहे.


मालपाणी दिल्याशिवाय फाइलच हलत नाही, गडकरींनी भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर ठेवले करेक्ट बोट

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -