Tuesday, June 6, 2023
27 C
Mumbai
घर उत्तर महाराष्ट्र यंदा द्राक्ष निर्यातीत ३५ टक्के घट; ७१६ कोटी रुपयांचा तोटा; अवकाळीचा निर्यातक्षम...

यंदा द्राक्ष निर्यातीत ३५ टक्के घट; ७१६ कोटी रुपयांचा तोटा; अवकाळीचा निर्यातक्षम द्राक्षाना फटका

Subscribe

नाशिक : यंदा पुन्हा अवकाळी पावसामुळे निर्यातक्षम द्राक्ष उत्पादनाला मोठा फटका बसला असून देशातील यंदा निर्यातीत ३५ टक्के घसरण होऊन जवळपास ७१६ कोटी रुपयांचा फटका बसला आहे. द्राक्ष निर्यातक्षम जिल्हा म्हणुन नाशिकची जगभरात ओळख आहे.द्राक्ष हंगामाच्या सुरवातीपासून अवकाळी पावसाने थैमान घातल्याने द्राक्ष निर्यातीला घट झाली आहे. आतापर्यंत देशातून १ लाख ६९ हजार ६५० मेट्रिक टन द्राक्ष निर्यात झाली असून या १५८६ कोटी रुपयांची उलाढाल झाली आहे.

अवकाळी पाऊस ,गारपीट, खते औषधांचे वाढलेले बाजारभाव अन शेतमालास कवडीमोल बाजार अश्या अनेक संकटात शेतकरी सापडला आहे. एकरी लाखो रुपये खरच करून हाती काही काहीच आले नसल्याने शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे.

- Advertisement -

पर्यावरणीय बदलामुळे शेती व्यवसाय दिवसेंदिवस आतबट्टयाचा ठरत आहे. सिंचन सुविधा जरी असली तरी रोज बदलत असलेल्या हवामानाला समर्थपणे तोंड देऊ शकेल अशी कोणतीही शाश्वत व्यवस्था नाही. यामुळे शेती करणे जिकिरीचे तर झाले आहेच, पण उत्पादित मालाला बाजारात हवा तसा दर मिळेल याचीही खात्री उरलेली नाही. कारण बर्‍याचवेळा मालाचे उत्पादन एकाच वेळी आणि एकाच ठिकाणी जादा झाल्याने भाव पडतात. तसेच शासनाचे आयातनिर्यात धोरणही कारणीभूत आहे. अश्या अनेक अडचणींवर मात करत मात्र जिद्दी शेतकरी द्राक्ष निर्यात केली आहे मात्र द्राक्ष निर्यातीत मोठी घट झाल्याचे आकडेवारी वरून दिसत आहे.

द्राक्ष निर्यात आलेख
  • २०१७-१८ -१८८२२१ मॅट्रिक टन- १९०० करोड
  • २०१८-१९ -२४६१३३ मॅट्रिक टन- २३३५ करोड
  • २०१९-२० -१९३६९० मॅट्रिक टन- २१७७ करोड
  • २०२०-२१ – २४६१०७ मॅट्रिक टन- २२९८ करोड
  • २०२१-२२ – २६३०७५ मॅट्रिक टन- २३०२ करोड
  • २०२२-२३ – १६९६५० मॅट्रिक टन- १५८६ करोड
या देशात होते निर्यात

नेदरलेंड, युनायटेड किंग्डम जर्मनी,लटवीया, डेन्मार्क स्वीडन पोर्तुगाल, स्विझर्लंड, पोलंड, बेल्जियम,फिनलेंड,इटली स्पेन आदी देशांत पाठविण्यात येतात.

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -