घरमहाराष्ट्रभाजप नेत्याच्या नंदुरबारमधील हॉटेलमध्ये हजारो रेमडेसिवीर इंजेक्शनचा साठा - नवाब मलिक

भाजप नेत्याच्या नंदुरबारमधील हॉटेलमध्ये हजारो रेमडेसिवीर इंजेक्शनचा साठा – नवाब मलिक

Subscribe

राज्यात रेमडेसिवीर इंजेक्शनवरुन विरोधक-सत्ताधारी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत आहेत. दरम्यान, आज अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी पत्रकार परिषद घेत भाजप आणि भाजपच्या नेत्यावर मोठा आरोप केला आहे. भाजपचे नेते शिरीष चौधरी नंदुरबारमधील हॉटेलमध्ये हजारो इंजेक्शनचा साठा असल्याचा आरोप नवाब मलिक यांनी केला. कोणाच्या परवानगी नंदुरबारमध्ये रेमडेसिवीरची इंजेक्शन वाटली, असा सवाल देखील मलिक यांनी केला. यावेळी त्यांनी FDA ने नंदुरबार जिल्हाधिकाऱ्यांना पत्र लिहून चौकशी करण्यास सांगितलं आहे, अशी माहिती दिली.

सुरतच्या कार्यालयामध्ये मोफत रेमडेसिवीरचं वाटप करण्यात येत आहे. यावर बोट ठेवल्यानंतर गुजरातच्या मुख्यमंत्र्यांनी स्पष्टीकरण दिलं की साठा कुठुन आला माहिती नाही. आम्ही परवानगी दिली नाही. त्यानंतर महाराष्ट्र भाजपचे नेते ५० हजार रेमडेसिवीर आणू असा दावा करु लागले. मात्र, परिस्थिती वेगळी होती. महाराष्ट्रामध्ये एप्रिलच्या पहिल्या आठवड्यापासून रेमडेसिवीरचा साठा त्यांच्या गोदामात उपलब्ध झाला होता. कंपनी चालवणारे एक भाजपचे नेते आहेत. मागच्या काळात जळगाव अंबरनेर मधून अपक्ष निवडून आले होते. २०१९ मध्ये भाजपच्या तिकीटावर लढले आणि हरले. नंदूरबारमध्ये त्यांच्या हिरा एक्सिक्यूटीव्ह या हॉटेलमध्ये हजारो वाईल्सचा साठा केला होता. त्याचे फोटो देखील त्यांनी उघड केले, असं मलिक यांनी सिंगतलं.

- Advertisement -

८ तारखेला त्यांच्या हॉटेलमध्ये रांगा लावून रेमडेसिवीरचं वाटप केलं.
दोन दिवस विकेंड असल्यामुळे वाटप करता येणार नसल्याचं त्यांनी सांगितलं. त्यानंतर त्यांनी १२ तारखेला वाप केलं. ७००-८०० रेमडेसिवीर वाटले, असा त्यांनी दावा केला. आमची माहिती आहे की, २० हजार इंजेक्शनच्या वाईल्स ब्रुक फार्मा कडून आणून ठेवल्या होत्या. ते त्यांनी जळगाव, नंदुरबार आणि धूळे या जिल्ह्यांमध्ये ब्लॅकने विकलं, असा आरोप मलिक यांनी केला आहे. आपल्याला ८ आणि १२ तारखेला वाटप करताना हिरा हॉटेलकडे, शिरीष चौधरी किंवा त्यांच्या स्टाफकडे FDA चा परवाना होता काय? महाराष्ट्र FDA ने कुठला परवाना दिला होता काय? दिव दमण च्या FDA ने परवाना दिला होता काय? असा सवाल मलिक यांनी केला.

माजी आमदार बेकायदेशीरपणे २०-२० हजार वाईल्स आणता आणि विकतात. त्यानंतर ते नेते प्रवीण दरेकर यांना घेऊन अन्न व प्रशासन मंत्री राजेंद्र शिंगणे यांना भेटतात आणि आम्हाला परवानगी मिळवून द्या असं सांगतात. १७ एप्रिलपर्यंत परवानगी दिली नाही. त्या काळात मोठ्या प्रमाणात हा धंदा सुरु होता. त्या ठिकाणचे राष्ट्रवादी आमदार अनिल पाटील यांनी मंत्रीमहोदयांना तक्रार केली आहे की या प्रकरणाची चौकशी केली पाहिजे, अशी माहिती मलिक यांनी दिली.

- Advertisement -

FDA ने नंदूरबार जिल्हा अधिकाऱ्यांना पत्र लिहून या प्रकरणाची चौकशी करुन कारवाई करण्यास सांगितलं आहे. तीन दिवस आधी मी आपल्याकडे तुटवडा असताना ज्या निर्यात करणाऱ्या कंपन्या आहेत त्यांना कॉल केला असता ते द्यायला तयार नाहीत. कुठेतरी आमची अडवणूक केली जात आहे, असं म्हटलं होतं. ब्रुक फार्माला महाराष्ट्राच्या FDA ने पत्र दिल्यानंतर केंद्रशासित प्रदेश दिव दमण च्या FDA ने सांगितलं की तुम्हाला महाराष्ट्राला इंजेक्शन देता येत नाहीत. बहुतांश ही कंपन्या दिव दमणला आहे किंवा गुजरातला आहे, तिथल्या FDA ने तुम्हाला देता येत नाही सांगितलं. मी मुद्दा उपस्थि केल्यानंतर केंद्रीय आरोग्य मंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला आणि तुटवडा दूर करण्यासाठी आश्वासनं दिली. आम्ही राजकारणासाठी आणला नव्हता. भाजप नेते सरकारला बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहेत, असं मलिक म्हणाले.

भाजपला राजकारणाशिवाय काही करता येत नाही. महाराष्ट्रातील भाजपचे नेत महाविकास आघाडी सरकार काम करत नाही, रेमडेसिवीर उपलब्ध करत नाही असा प्रचार करत आहेत. देशात ७ कंपन्यांना रेमडेसिवीर उत्पादन आणि मार्केटिंग करण्याची परवानगी आहे. १७ कंपन्या निर्यातीसाठी स्वत:च औषध निर्मिती करु शकतात. २ कंपन्यांच्या मदतीने जगभरात निर्यात करु शकतात, असं मलिक यांनी सांगितलं.

 

Girish Kamble
Girish Kamblehttps://www.mymahanagar.com/author/girishk/
गेल्या ३ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -