घरमहाराष्ट्रदापोडी दुर्घटने प्रकरणी तीन आरोपींना अटक; ६ डिसेंबर पर्यंत पोलीस कोठडी

दापोडी दुर्घटने प्रकरणी तीन आरोपींना अटक; ६ डिसेंबर पर्यंत पोलीस कोठडी

Subscribe

दापोडी येथील झालेल्या दुर्घटनेत एका कामगारासह अग्निशमन दलाचे जवान विशाल जाधव हे शहिद झाले होते. तर चार जण जखमी झाले होते. या घटनेप्रकरणी तीन आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांना मंगळवारी खडकी न्यायालयात हजर केले असता त्यांना न्यायालयाने आरोपींना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. सुनील रमेश शिंदे (वय ३०, रा. डांगेचौक, थेरगाव), धनंजय सुधाकर सगट (वय २९, रा. गणेशनगर, थेरगाव), अशोक माणिकराव पिल्ले (वय ५७, रा. चंदननगर, खराडी, पुणे) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. यांच्यासह मे. पाटील कन्ट्रक्‍शनचे मालक एम. बी. पाटील आणि महापालिकेच्या अधिकाऱ्यांवरही गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी मयत कामगार नागेश जमादार याच्या वडिलांनी कल्याणी पिरप्पा जमादार यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.


हेही वाचा – दापोडीतील दुर्घटनेत मातीचा ढिगारा कोसळून अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्याचा मृत्यू

- Advertisement -

आरोपींना ६ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दापोडी येथे रविवारी झालेल्या दुर्घटनेत कामगार नागेश जमादार आणि अग्निशमन दलाचे कर्मचारी विशाल जाधव यांच्या अंगावर मातीचा ढिगारा पडून मृत्यू झाला होता. तर चार जण या घटनेत जखमज झाले, यातील दोघांवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या गंभीर घटनेप्रकरणी भोसरी पोलिसांनी सोमवारी तिघांना अटक केली आहे. शिंदे, सगट आणि पिल्ले यांना मंगळवारी खडकी येथील न्यायालयात हजर केले असता त्यांना ६ डिसेंबर पर्यंत पोलीस कोठडी ठेवण्याचे आदेश दिले आहेत.


हेही वाचा – दापोडी दुर्घटनेत कामगाराचा मृत्यू; मृतांचा आकडा दोन वर

- Advertisement -

काय आहे प्रकरण?

पिंपरी-चिंचवडमध्ये अमृत योजनेअंतर्गत सुरू असलेल्या खोद कामादरम्यान कामगाराच्या अंगावर मातीचा ढिगारा पडला. त्याला वाचवण्यासाठी अग्निशमन दलाचे बचाव कार्य सुरू होते. त्यावेळी पुन्हा मातीचा ढिगारा कोसळला आणि यात अग्निशमन दलाचे जवान विशाल जाधव, निखिल गोगावले आणि सरोष फुंदे हे कर्मचारी अडकले गेले. निखिल आणि सरोष यांना सुखरूप बाहेर काढले असून विविध खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर विशाल जाधव यांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला. या घटनेप्रकरणी पोलिसांचा तपास सुरु आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -