घरमहाराष्ट्रदापोडी दुर्घटनेत कामगाराचा मृत्यू; मृतांचा आकडा दोन वर

दापोडी दुर्घटनेत कामगाराचा मृत्यू; मृतांचा आकडा दोन वर

Subscribe

पिंपरी-चिंचवडमध्ये अमृत योजनेअंतर्गत खोदकाम सुरू असताना एका कामगाराच्या अंगावर मातीचा ढिगारा कोसळल्याने त्याच्या मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. नागेश जमादार अस मृत्यू झालेल्या कामगाराचे नाव असून बचावकार्य करत असताना अग्निशमन दलाचे जवान विशाल जाधव हे देखील या दुर्घटनेत शहीद झाले आहेत. तर अन्य दोन तरुण सुखरूप असून दोन कर्मचाऱ्यांवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घटनेच्या चौकशीचे आदेश पिंपरी-चिंचवड महानगर पालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी दिले आहेत. मनुष्य वधाचा गुन्हा संबंधितांवर दाखल करण्यात येईल असं ही ते म्हणाले आहेत.

रविवारी सायंकाळी दापोडी येथे खोदकाम सुरू असताना मातीचा ढिगारा अंगावर पडल्याने मयत कामगार नागेश गाडला गेला होता. त्याला बाहेर काढण्यासाठी दोन तरुण खड्ड्यात उतरले. काही वेळानंतर अग्निशमन दलाचे तीन जवान खड्ड्यात उतरले बचावकार्य सुरू असताना अचानक सर्वांच्या अंगावर मातीचा ढिगारा कोसळला आणि त्यात सहा जण गाडले गेले. पैकी, दोन तरुण, तीन जवान काढण्यात यश आले. परंतु, उपचारादरम्यान विशाल जाधव हे शहीद झाले आहेत. तर कामगार नागेश हा तब्बल नऊ तास खड्ड्यात गाडला गेलेला होता.

- Advertisement -

एनडीआरएफ,अग्निशमन दल,पोलीस कर्मचारी,लष्कर हे सर्व घटनास्थळी दाखल झाले होते. बचावकार्य सुरू होते. तब्बल नऊ तासांनी पहाटे साडेतीन च्या सुमारास नागेश चा मृतदेह खड्ड्याच्या बाहेर काढण्यात आला आहे. या दुर्दैवी घटनेत ऐकून दोन जणांचा मृत्यू झाला असून दोन अग्निशमन दलाचे कर्मचारी जखमी झाले आहेत.

हेही वाचा –

संजय राऊत यांचे नवे ट्विट; भाजपवर पुन्हा हल्लाबोल

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -