Eco friendly bappa Competition
घर महाराष्ट्र काल-परवापर्यंत स्वाभिमानाने जगणाऱ्यांना..., आशिष शेलार यांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

काल-परवापर्यंत स्वाभिमानाने जगणाऱ्यांना…, आशिष शेलार यांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

Subscribe

मुंबई : बिहारमधील पाटणा, कर्नाटकमधील बंगळुरू पाठोपाठ विरोधकांच्या आघाडीची मुंबईत बैठक होत आहे. ग्रॅण्ड हयात या पंचतारांकित हॉटेलमध्ये आज, गुरुवार आणि उद्या, शुक्रवारी होणाऱ्या या बैठकीत ‘इंडिया’ आघाडीचा लोगो आणि इतर मुद्द्यांवर चर्चा होणार आहे. यावरून भाजपा आक्रमक झाली असून त्यांनी या बैठकीवर जोरदार टीकास्त्र सोडले आहे. तर, या बैठकीचे यजमानपद स्वीकारणारे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर भाजपा आमदार Adv. आशिष शेलार यांनी निशाणा साधला आहे.

- Advertisement -

भाजपाप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडी ‘अब की बार मोदी सरकार’चा नारा देत 2014मध्ये केंद्रात सत्तेवर आल्यानंतर 2019मध्येही रालोआने निर्विवाद बहुमत मिळविले. या निवडणुकीत विरोधकांनी एकत्र येण्याचा प्रयत्न केला, परंतु कोलकात्यातील रॅलीच्या पुढे त्यांची ही एकी टिकलीच नाही. त्या निवडणुकीला प्रत्येक पक्ष स्वतंत्रपणे सामोरा गेला. त्यामुळे रालोआला तसा विरोध झाला नाही.

हेही वाचा – ‘इंडिया’ नावाला टींब लावून विरोधकांच्या आघाडीने दुष्कृत्य केलं; भाजपाकडून मुंबईतील बैठकीवर हल्लाबोल

- Advertisement -

आता 2024च्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देशात हुकूमशाही येत असल्याचा आरोप करत विरोधकांनी आता एकजूट दाखविली आहे. 23 जून 2023 रोजी विरोधकांची पहिली बैठक बिहारमधील पाटणा येथे झाली. त्या बैठकीला 15 विरोध पक्ष उपस्थित होते. त्यानंतर दुसरी बैठक 18 जुलै 2023 रोजी बंगळुरूमध्ये झाली. या बैठकीत 26 विरोधी पक्षांच्या नेत्यांनी हजेरी लावली. या बैठकीत विरोधकांच्या आघाडीचे ‘इंडिया’ असे नामकरण करण्यात आले. आता ‘इंडिया’ नामक विरोधकांच्या आघाडीची तिसरी बैठक मुंबईत होत आहे.

यासंदर्भात मुंबई भाजपाचे अध्यक्ष आमदार आशिष शेलार यांनी ट्वीट केले आहे. मुंबईत डरपोकांचा मेळावा ‘घमंडिया’ नावाने होत आहे. ज्यांनी ज्यांनी काल-परवापर्यंत हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आणि महाराष्ट्राचा द्वेष केला, ज्या काँग्रेसने स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचा अपमान केला, संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात हुतात्म्यांवर गोळ्या झाडल्या, अशा सगळ्यांचे महाराष्ट्रात माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे वाजत-गाजत जोरदार स्वागत करीत आहे, असे आशिष शेलार यांनी म्हटले आहे.

हेही वाचा – मुंबईतील बैठकीचा ‘तोच’ संदेश, ठाकरे गटाचा इंडिया आघाडीवरून मोदी सरकारला इशारा

महाराष्ट्राचा द्वेष करणाऱ्यांना मोदक आणि पंचपक्वान्नाचे पंचतारांकित जेवण घालून उद्धव ठाकरे हे त्यांची तोंडे गोड करीत आहेत. पंगती बसू दे आणि जेवणावळीही उठू दे… फक्त काल-परवापर्यंत स्वाभिमानाने जगणाऱ्यांना महाराष्ट्रद्रोह्यांच्या उष्ट्या पत्रावळ्या उचलताना जनाची नाही, किमान मनाची तरी वाटू दे, अशा शब्दांत त्यांनी ठाकरेंवर निशाणा साधला आहे.

- Advertisment -