घरताज्या घडामोडीपर्यटन महामंडळ राबविणार 'वर्क फ्रॉम नेचर' आणि 'वर्क विथ नेचर' संकल्पना

पर्यटन महामंडळ राबविणार ‘वर्क फ्रॉम नेचर’ आणि ‘वर्क विथ नेचर’ संकल्पना

Subscribe

पर्यटकांच्या स्वागतासाठी पर्यटन महामंडळ सज्ज

दिवाळी सुट्टीचे वेध लागल्याने पर्यटकांची पावले आता पर्यटनस्थळांकडे वळू लागली असून महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ पर्यटकांच्या स्वागतासाठी सज्ज झाले आहे. अजूनही काही खासगी कार्यालयांमध्ये ‘वर्क फ्रॉम होम’सुरु असल्याने एमटीडीसीने ‘वर्क फ्रॉम नेचर’ आणि ‘वर्क विथ नेचर’ ही संकल्पना राबवली आहे. पर्यटन महामंडळाने हिवाळी पर्यटन आणि दीपावली सुट्यांसाठी नवनव्या संकल्पना राबविण्याची जोरदार तयारी केली आहे. पर्यटकांसाठी विविध सवलती जाहीर केल्या आहेत. जेष्ठ नागरिक, शासकीय कर्मचारी यांना आगाऊ बुकिंगसाठी सवलती जाहीर केल्या आहेत.

जेष्ठ नागरिक, शासकीय कर्मचाऱ्यांना आगाऊ बुकिंगसाठी सवलती जाहीर केल्या आहेत. सामाजिक बांधिलकी जपताना आजी–माजी सैनिक आणि दिव्यांगांसाठी विशेष सवलती दिल्या आहेत. ग्रुप बुकिंगमध्ये २० खोल्यांपेक्षा जास्त बुकिंग असल्यास सवलत, शालेय सहलींसाठीही विशेष सवलती देण्यात येत आहेत. याबरोबरच काही नाविन्यपूर्ण निर्णय घेताना महामंडळाने पर्यटकांचा आनंद द्विगुणीत करण्यासाठी १ ऑक्टोबर पासून ‘कॉम्लीमेंटरी ब्रेकफास्ट’ सुरु केला आहे.

- Advertisement -

पर्यटकांनी याचा फायदालाभ घ्यावा, असे आवाहन महामंडळाचे पुणे प्रादेशिक व्यवस्थापक दीपक हरणे यांनी केले आहे.कोरोनाचे सर्व नियम पाळून या सुविधा दिल्या जाणार असून पर्यटकाना निवासाचे आरक्षण www.mtdc.co या संकेतस्थळावरून करता येईल.


हेही वाचा –  वयोमर्यादा ओलांडलेल्या विद्यार्थ्यांना २ वर्षांची संधी द्या, खासदार संभाजीराजेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -