घरमहाराष्ट्र‘वीकेंड’ला गर्दीची लाट, पर्यटनस्थळी हुल्लडबाजी

‘वीकेंड’ला गर्दीची लाट, पर्यटनस्थळी हुल्लडबाजी

Subscribe

नियमांचे उल्लंघन, राजूर पोलिसांकडून ५० पर्यटकांवर दंडात्मक कारवाई

राजूर : भंडारदरा, कळसुबाई, रतनगड परिसरात वीकेंड लॉकडाऊन अन् बंदी असतानाही नियमांचे उल्लंघन करत रविवारी (दि.४) हौशी व बेशिस्त पर्यटकांनी गर्दी केलेली दिसून आली. मद्यधुंद पर्यटकांकडून भरस्त्यात धिंगाणा घातला जात असल्याने रविवारी वाहतूक कोंडी झाल्याचे पाहायला मिळाले. परिणामी, राजूर पोलिसांनी ५० पर्यटकांवर दंडात्मक कारवाई केली.

वीकेंड लॉकडाऊन असताना अन् पर्यटन स्थळी बंदी असतानाही शनिवारी (दि.३) सायंकाळी व रविवारी (दि.४) दिवसभर हौशी पर्यटकांनी गर्दी केली. त्यामुळे रस्त्याच्या दुतर्फा वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. काही मद्यधुंद पर्यटकांनी रस्त्याच्या कडेला आपली वाहने उभी करून धिंगाणा घातला. ही बाब राजूर व भंडारदरा पोलिसांना समजताच पोलिसांनी घटनास्थळी येत मद्यधुंद व हौशी पर्यटकांची धरपकड सुरू केली. त्यामुळे पर्यटक मार्ग दिसेल त्या दिशेने पळू लागले. मात्र, काही पर्यटकांना पोलिसांनी ताब्यात घेत त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -