घरठाणेदुचाकीमुळे ओमकार शाळेबाहेर वाहतूक कोंडी

दुचाकीमुळे ओमकार शाळेबाहेर वाहतूक कोंडी

Subscribe

कल्याण । डोंबिवली एमआयडीसी निवासी मधील ओमकार इंग्लिश स्कूल यांच्या बसेस, पालकांची वाहने, विद्यार्थ्यांच्या सायकली यांच्यामुळे निवासी परिसरात वाहतूककोंडीची मोठी समस्या निर्माण झाली आहे. विशेष म्हणजे शाळेच्या आवारात प्रशस्त जागा असतानाही विद्यार्थ्यांचा सायकली शाळेचा बाहेर का ठेवायला शाळा प्रशासन विद्यार्थांना सक्ती करीत आहे. आधीच एमआयडीसी भागात रस्त्यांचे काँक्रीटीकरणमुळे वाहतुकीस काही रस्ते अर्धे तर काही रस्ते पूर्ण बंद आहेत.

अशातच एकामागून एक शाळेच्या बसेस बेशिस्तपणे येत जात असतात. त्यात काही पालकही बेशिस्तपणे आपली वाहने शाळेच्या चारही गेट समोर उभी करीत असल्याने शाळेच्या चारी बाजूचा रस्त्यावर प्रचंड वाहतूककोंडी होते. त्यामुळे एखादा अपघात भविष्यात होऊ शकतो. याबद्दल येथील काही जागरूक नागरिकांनी पोलिसांकडे पण तक्रारी केल्या आहेत. मुजोर शाळा प्रशासन कोणाचेही ऐकण्याचा मनस्थितीत नसल्याने येथील नागरिक याबद्दल त्रस्त झाले आहेत.

- Advertisement -

येथील नागरिकांच्या या शाळेविषयी अनेक तक्रारी शिवसेना एमआयडीसी शाखेत आल्याने शिवसेना विभाग प्रमुख अशोक पगारे यांच्या नेतृत्वाखाली एक शिष्टमंडळ ओमकार इंग्लिश स्कूलच्या मुख्याध्यापिका शेट्टी यांना याविषयी माहिती देऊन एक निवेदन देण्यात आले. शाळा प्रशासनाने याबाबत काही उपाययोजना करण्याचे कबूल केले आहे. तरीपण जर येत्या 15 दिवसांत सदर शाळेने याविषयी काहीच हालचाल केली नाही तर या शाळे विरूध्द पोलीस, आरटीओ, एमआयडीसी, केडीएमसी, शिक्षण विभाग इत्यादी सर्व ठिकाणी हजारो नागरिकांच्या सह्यानिशी तक्रारी शिवसेना एमआयडीसी शाखेतर्फे करण्यात येतील शिवाय पुढे लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचा विचार करावा लागेल असा इशारा देण्यात आला. निवेदन देताना शिष्टमंडळात विभाग प्रमुख अशोक पगारे, माजी नगरसेवक भालचंद्र म्हात्रे, उपविभाग प्रमुख सुरेश साने, दिलीप साळवी, जयसिंग आयरे, रामदास मेंगडे, विजय कुलकर्णी हे उपस्थित होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -