घरताज्या घडामोडीMumbai - Nashik Expressway: चिखलाने रोखला मुंबई-नाशिक महामार्ग

Mumbai – Nashik Expressway: चिखलाने रोखला मुंबई-नाशिक महामार्ग

Subscribe

ठाण्यातून कल्याणच्या दिशेकडे चाललेल्या अज्ञाच ट्रकमधील चिखल रस्त्यावर पडल्याने गुरुवारी दुपारी बारा-सव्वा बारा वाजण्याच्या सुमारास मुंबई नाशिक महामार्ग काही मिनिटांसाठी रोखला गेला. प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन विभागाने रस्त्यावर पडलेल्या चिखलावर पाण्याचा मारा करून तो चिखल रोडच्या बाजूला केल्यानंतर मुंबई-नाशिक महामार्गावरील वाहतूक पूर्वपदावर आल्याची माहिती आपत्ती विभागाने दिली.

मुंबई-नाशिक महामार्गावरील साकेत पुलाजवळ गुरुवारी दुपारी १२.१० वाजण्याच्या सुमारास अज्ञात ट्रकमधून चिखल पडल्याची माहिती मिळताच प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन, अग्निशमन दल आणि वाहतूक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पण पडलेल्या चिखलाचा परिणाम वाहतुकीवर होऊ लागल्याने तातडीने तो चिखल रस्त्याच्या एका बाजूला करण्याचे काम हाती घेतले. त्या पडलेल्या चिखलावरती अग्निशमन दलाच्या रेस्क्यु वाहनातील होज पाईपच्या मदतीने पाण्याचा मारा करून चिखल रोडच्या बाजूला केला आहे. त्यानंतर वाहतूक पूर्वपदावर आली. या घटनेत कोणतीही जीवितहानी किंवा, कोणालाही दुखापत झाली नसल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली.

- Advertisement -

हेही वाचा – पाचव्या-सहाव्या रेल्वेमार्गाचे लोकार्पण


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -