Sell Smartphone: जुना स्मार्टफोन योग्य किंमतीला विकायचाय? फॉलो करा ‘या’ वेबसाईट्स

Sell Smartphone sell your old used mobile smartphone on these website get good price
Sell Smartphone: जुना स्मार्टफोन योग्य किंमतीला विकायचाय? फॉलो करा 'या' वेबसाईट्स

हल्ली क्षणाक्षणाला बदलणाऱ्या तंत्रज्ञानाच्या युगात आपल्याकडील स्मार्टफोनही आऊटडेटेड वाटायला लागतात. दर काही दिवसांनी अपडेट होणारे फिचर्स आपल्या मोबाईलमध्येही हवेत असे वाटू लागते. त्यामुळे अनेकदा स्मार्टफोन घेतल्यानंतर तो मनासारखा मिळाला नाही याचा पश्चाताप होत राहतो, त्यामुळे अलीकडच्या काळात जुना स्मार्टफोन विकून नवा स्मार्टफोन घेणाऱ्यांची संख्या जास्त आहे.

मात्र जुना स्मार्टफोन विकणे अनेकदा खूप अवघड काम होऊन बसते. लोकांना त्यांच्या जुन्या स्मार्टफोनशी एक ओळख झालेली असते त्यामुळे अनेकदा नवीन फोन खरेदी केल्यानंतरही जुना फोन जवळ ठेवतात. मात्र हळूहळू तो फोन खराब होऊ लागतो. यामुळे त्या फोनची काहीच किंमत मिळणार नाही असा विचार करून तो स्मार्टफोन घरात ई-कचरा म्हणून पडून राहतो. आजकाल अनेक जण जुना स्मार्टफोन डीलच्या चक्करमध्ये एक्स्जेंच करत असतात. यात ई-कॉमर्स वेबसाईट्सकडूनही दररोज एक्स्जेंज ऑफर दिल्या जातात.

बर्‍याच एक्सचेंज ऑफरमधून ग्राहकांचे नुकसान होत आहे. स्मार्टफोनची किंमत कमी दाखवत असली तर अशाप्रकारे स्मार्टफोनची विक्री करणे ग्राहकांना सोपे वाटते. त्यामुळे अनेक जण आता एक्स्चेंज ऑफरचा पर्याय निवडत आहेत.

परंतु ग्राहकांनी स्मार्टफोन एक्स्चेंज ऑफरमध्ये विकण्यापेक्षा तो सेलिंग वेबसाईटवर लिस्ट करणे केव्हाही योग्य ठरते. या OLX सारख्या वेबसाईट्स आहेत जिथे तुम्ही तुमचा स्मार्टफोन विकू शकता. परंतु याठिकाणी फोन विकतानाही सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे.

मात्र ही फोन सेलिंग वेबसाईट्सवर लिस्ट करण्यापूर्वी त्याला डिसेंट कंडिशनमध्ये आणा, स्वच्छ करा, ऑन करा, बॅटरी चेक करा, बॉक्स शोधा, अडॅप्टर आणि चार्जर शोधून ठेवा. अशाप्रकारे योग्य बॉक्समध्ये तो स्मार्टफोन ठेवा.

आता व्यवस्थितरित्या पॅक केलेल्या स्मार्टफोनचा फोटो क्लिक करुन तो वेबसाईटवर अपलोड करा. OLX सारख्या वेबसाईट्सवर ऐड पोस्ट फ्रीमध्ये होते. तुम्हाला फक्त फिचर्ड पोस्ट आणि बूस्ट पोस्टसाठी पैसे द्यावे लागतात.

तुमच्या स्मार्टफोनची अॅड बूस्ट करण्यासाठी थोडे पैसे टाकून बूस्ट करा किंवा फीचर्ड एरियामध्ये ठेवा. यातून तुम्हाला मोठ्याप्रमाणात कस्टमर्स मिळण्यास मदत होईल. तसेच मनाप्रमाणे स्मार्टफोनची किंमत मिळू शकते.

जुने किंवा वापरलेले स्मार्टफोन विकण्यासाठी Cashify ही एक वेबसाईट प्रसिद्ध वेबसाईट्स आहे. यावरून मोबाईलसह अनेक इलेक्ट्रॉनिक्स गॅझेटची विक्री करत चांगली किंमत मिळवू शकता. याववरून टीव्ही, लॅपटॉप, टॅबलेट, आयमॅक आणि गेमिंग कन्सोलही विकण्याची सुविधा आहे.

Karma Recycling ही देखील अशीच एक वेबसाईट आहे ज्याद्वारे आपल्याला जुन्या स्मार्टफोनची विक्री करता येते. इलेक्ट्ऱॉनिक वस्तूंच्या विक्रीचा वेबसाईटवरील ट्रॅक रेकॉर्ड चांगला राहिला आहे. महागाते महाग मोबाईल देखील यावरून विकता येतात.

www.yaantra.com ही वेबसाईट देखील इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या विक्रीसाठी झटपट असलेली वेबसाईट म्हणून ओळखली जाते. या वेबसाईटच्या माध्यमातून जुन्या इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंना मिळणारी रक्कमही इतर वेबसाईट्सच्या तुलनेत चांगली मिळत असल्याचे म्हटले जाते. या वेबसाईटवरून अवघ्य़ा एका मिनिटातही जुना स्मार्टफोन विकता येतो.

यानंतर Get Insta Cash ही वेबसाईट देखील जुने स्मार्टफोन विक्रीसाठीची एक आघाडीची वेबसाईट ओळखली जाते. यासाठी तुम्हाला https://getinstacash.in/ वर लॉईन करत आपले डिटेल्स टाकावे. यानंतर कंपनीचे कर्मचारी घरी येऊन तुमची इलेक्ट्रॅनिक गॅझेट कलेक्ट करत सर्व माहिती घेत ठरलेली InstaCash तुमच्या हातात देतात.


हिंदुस्थानी भाऊला मुंबई सत्र न्यायालयाकडून जामीन मंजूर