घरमहाराष्ट्रमुंबई पोलीस दलातील 19 पोलीस अधिकार्‍यांच्या बदल्या

मुंबई पोलीस दलातील 19 पोलीस अधिकार्‍यांच्या बदल्या

Subscribe

आश्विनी पाटील यांची वाहतूक विभागातून नागपूर शहर पोलीस उपायुक्तपदी, समीर शेख यांची पायधुनी विभागातून पोलीस अधीक्षक, राज्य नियंत्रण कक्षात तर आश्विनी पाटील ऊर्फ आश्विनी शेलार यांची शीव विभागातून राज्य गुप्तवार्ता विभागाच्या पोलीस उपायुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे

मुंबई – मुंबई पोलीस दलातील 19 पोलीस अधिकार्‍यांच्या बदल्या करण्यात आल्या असून, त्यात काही अधिकार्‍यांना बढती देऊन त्यांच्या बदलीचे आदेश जारी करण्यात आले आहे. पाच पोलीस अधिकार्‍यांना मुंबईतून कार्यमुक्त करण्यात आले तर सहाय्यक पोलीस आयुक्तपदी बढती देण्यात आलेल्या पाच अधिकार्‍यांची बदली करण्यात आली आहे. सांताक्रूझ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विनोद गावकर यांची वरिष्ठ पोलीस निरीक्षक म्हणून बढती देऊन त्यांची खार पोलीस ठाण्यात बदली करण्यात आली आहे.

तीन सहाय्यक पोलीस आयुक्तांना उपायुक्त म्हणून बढती देण्यात आली आहे. बढतीनंतर त्यांची बदलीचे आदेश जारी करण्यात आले आहे. त्यात आश्विनी पाटील यांची वाहतूक विभागातून नागपूर शहर पोलीस उपायुक्तपदी, समीर शेख यांची पायधुनी विभागातून पोलीस अधीक्षक, राज्य नियंत्रण कक्षात तर आश्विनी पाटील ऊर्फ आश्विनी शेलार यांची शीव विभागातून राज्य गुप्तवार्ता विभागाच्या पोलीस उपायुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. पाच वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना सहाय्यक पोलीस आयुक्तपदी बढती देऊन त्यांची बदली करण्यात आली आहे. त्यात राघवेंद्र ठाकूर यांची विशेष शाखेतून वाहतूक विभाग, संतोष बागवे यांची विशेष शाखा एकमधून कुलाबा विभाग, रेहाना गफुर शेख यांची ट्रॉम्बे पोलीस ठाण्यातून संरक्षण आणि सुरक्षा विभाग, रमेश खाडे यांची नागपाडा पोलीस ठाण्यातून शीव विभाग, भीमराव व्हनमाने यांची संरक्षण व सुरक्षा विभागातून मंत्रालय सुरक्षा विभागात बदली करण्यात आली आहे.

- Advertisement -

ज्या चार सहाय्यक पोलीस आयुक्ताच्या अंतर्गत बदल्या झाल्या आहेत, त्यात मृत्यूजंय हिरेमठ यांची कुलाबा येथून आर्थिक गुन्हे शाखा, संजय जगताप यांची मंत्रालय सुरक्षा विभागातून माटुंगा विभाग, शशिकांत माने यांची आर्थिक गुन्हे शाखेतून डी. एन. नगर विभाग, ज्योत्स्ना रासम यांची डी. एन. नगर विभागातून पायधुनी विभागात बदली झाली आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षकांमध्ये रवींद्र रणशेवरे यांची विशेष शाखा एकमधून ट्रॉम्बे पोलीस ठाणे, महेश ठाकूर यांची गुन्हे शाखेतून नागपाडा पोलीस ठाणे आणि राजेंद्र मांढरे यांची विशेष शाखा दोनमधून मेघवाडी पोलीस ठाणे, प्रविण राणे यांची समतानगर वाहतूक पोलीस चौकी, नरेंद्र शिंदे यांची समतानगर पोलीस ठाण्यातून वाहतूक विभाग बदली करण्यात आली आहे. दोन वरिष्ठ पोलीस निरीक्षकांची बदली करण्यात आली आहे. त्यात गजानन काब्दुले यांची विशेष शाखा एकमधून ठाणे शहर, संजीव पिंपळे यांची डहाणू उपविभागात बदली करण्यात आली आहे. पोलीस निरीक्षक विनोद गावकर यांची खार पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे.


हेही वाचाः दृष्टी कमी झाली, बहिरेपणा आला; तुरुंगात असताना संजय राऊतांना जडल्या व्याधी

Vaibhav Desai
Vaibhav Desaihttps://www.mymahanagar.com/author/vaibhavr/
गेल्या 14 वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत; प्रिंट मीडिया चार वर्षे अनुभव, डिजिटल माध्यमाचा साडेनऊ वर्षांचा अनुभव आहे. तसेच अर्थकारण विषयावर लिखाणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -