घरदेश-विदेशदेशात दोन करोना रुग्ण

देशात दोन करोना रुग्ण

Subscribe

केंद्र सरकारच्या आरोग्य मंत्रालयाची माहिती

देशात आणखी दोन करोना विषाणूचे रुग्ण आढळून आले आहेत. नवी दिल्ली आणि तेलंगणा राज्यात हे करोनाग्रस्त रुग्ण असल्याची माहिती केंद्र सरकारच्या आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आली आहे. भारतात करोनाचे संशयित रुग्ण आढळले होते. मात्र त्यापैकी एकही रुग्ण करोना पॉझिटीव्ह आढळला नव्हता. हे दोन रुग्ण प्रथमच करोना पॉझिटीव्ह आढळले आहेत.

सरकारकडून देशात दोन करोनाग्रस्त रुग्ण पॉझिटीव्ह आढळल्याचे सांगण्यात आले आहे. त्यापैकी एक रुग्ण दिल्लीत तर दुसरा रुग्ण तेलंगणात आढळून आला आहे. दिल्ली येथे पॉझिटीव्ह आढळेला रुग्ण हा इटलीतून भारतात आलेला आहे. तर, तेलंगणातील रुग्ण हा दुबईतून आला आहे. सध्या या दोन्ही रुग्णांची प्रकृती स्थिर असून त्यांना डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे. तसेच, त्यांच्यावर योग्य ते उपचार सुरू आहेत.

- Advertisement -

हे दोन नवे रुग्ण आढळल्यानंतर आता रुग्णांवर बारीक लक्ष पुरवण्यात येत असल्याचे आरोग्य मंत्रालयातून सांगण्यात येत आहे. या दोन्ही रुग्णांची प्रकृती स्थिर असल्याची माहितीही आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.

यापूर्वी चीनमधून आणण्यात आलेल्या भारतीय नागरिकांना मानेसर येथील अलिप्त केंद्रांमध्ये ठेवण्यात आले आहे. या लोकांना कुणालाही भेटण्याची परवानगी नाही. तर, दुसरीकडे परदेशातून येणार्‍या सर्व प्रवाशांची विमानतळावर थर्मल स्क्रीनिंग करण्यात येत आहे.

- Advertisement -

यापूर्वी करोना विषाणूची लागण झाल्याच्या संशयावरून इतरांपासून पूर्ण वेगळे ठेवून उपचार करण्यात येत असलेल्या एका रुग्णाचा एर्नाकुलम वैद्यकीय महाविद्यालयाच्या इस्पितळात शुक्रवारी रात्री मृत्यू झाला. केरळमधील या रुग्णाला खरंच करोनाची लागण झाल्याचे अद्याप सिद्ध झाले नाही. पण, तसे सिद्ध झाले, तर जगभर धुमाकूळ घालणार्‍या या विषाणूने घेतलेला भारतातील तो पहिला बळी ठरेल.

या देशांमधून येणार्‍या प्रवाशांची तपासणी
चीन, दक्षिण कोरिया, जपान, इटली, इराण, हाँगकाँग, तैवान, सिंगापूर, मलेशिया, व्हीएतनाम, इंडोनेशिया व नेपाळ या देशातून विमानतळावर येणार्‍या प्रत्येक प्रवाशाची होणार कोरोना तपासणी. ती व्यक्ती भारतीय असो वा परदेशी, तपासणी होणारच. या प्रत्येक प्रवाशाचा पत्ता आणि मोबाइल क्रमांक गोळा केला जाणार. जो भारतीय प्रवासी हे देणार नाही, त्याला अनिवार्यपणे वेगळ्या ठिकाणी ठेवले जाईल. तसेच परदेशी नागरिकांना देशात प्रवेश दिला जाणार नाही, अशा सूचना केंद्रीय गृह मंत्रालयाने विमानतळांना दिल्या आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -