घरCORONA UPDATEजागतिक कोरोना अपडेटसंगमनेरात दोन कोरोनाबाधित महिलांचा मृत्यू

संगमनेरात दोन कोरोनाबाधित महिलांचा मृत्यू

Subscribe

जिल्ह्यात आढळले नवे सहा रुग्ण, संगमनेरातील तिघांचा समावेश

संगमनेरमध्ये नायब तहसीलदाराला कोरोनाची बाधा होऊन काही तास उलटत नाही तोच मंगळवारी सकाळीच संगमनेरमधील दोन बाधित महिलांचा मृत्यू झाल्याची वार्ता येवून धडकली आहे. यासोबतच आणखी तीन नवे रुग्ण संगमनेरात आढळले असून जिल्ह्यात सहा बाधित आढळले आहेत. संगमनेरमधील मृतांचा आकडा आता सातवर तर बाधितांची सख्या ६५ वर गेली आहे.

मृत्यू झालेल्यात नायकवाडपुरा येथील ६३ व मोमीनपुरा येथील ६५ वर्षीय महिलांचा समावेश आहे. ६ जुनला या दोन्ही महिला कोरोनाबाधित आढळल्याने त्यांच्यावर नगरच्या जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु होते. तर नव्याने आढळलेल्या तीन रुग्णांपैकी दोघांना संपर्कातून तर एकाला परराज्यातील प्रवासातून ही बाधा झाल्याचे समोर आले. शहरातील तीन बाधीतांमध्ये २३ वर्षीय महिलेचा समावेश असून ती मदिनानगरमध्ये राहते. तर नायकवाडपुरा (पुणेनाका) येथे ३५ वर्षीय तरुण बाधित आढळला आहे. याशिवाय मदिनानगरमध्येच राहणाऱ्या ५२ वर्षीय व्यक्तीलादेखील कोरोनाची बाधा झाली असून ही व्यक्ती वाहन चालक असून तो बंगळुरु येथून आला होता.

- Advertisement -

संगमनेर कोरोनाचे जिल्ह्यातील हॉटस्पॉट ठरले आहे. जिल्ह्यात बाधित आढललेल्या रुग्णात सर्वाधिक रुग्ण संगमनेरचे असून मृतांचाही आकडाही येथे सर्वाधिक आहे. या दोन महिलांसह आत्तापर्यत संगमनेरातील सात जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे.

नवे सहा रुग्ण

जिल्ह्यात आढळलेल्या नव्या सहा रुग्णांपैकी तीन संगमनेरमधील आहे. तर उर्वरित बाधितापैकी दोघे राहाता तालुक्यातील आहेत. तर अन्य एकजण नगर शहरातील पंचपीर चावडी परिसरातील आहे. राहाता तालुक्यातील निमगाव निघोज येथील २३ वर्षीय व्यक्ती व राहाता शहरातील बोठे गल्ली येथील ३६ वर्षीय व्यक्ती कोरोनाबाधित आढळले आहे. नगरच्या माळीवाडा भागातील पंचपीर चावडी येथील ६९ वर्षीय व्यक्ती बाधित आढळली आहे. यापुर्वी लागण झालेल्या व्यक्तीच्या संपर्कातून ही बाधा झाल्याची माहिती नोडल अधिकारी डॉ. बापुसाहेब गाढे यांनी दिली.

- Advertisement -

जिल्ह्यात पाच जणांनी केली मात

कोरोनावर मात केलेल्या पाच व्यक्तींना आज घरी सोडण्यात आले यात शेवगाव, अकोले व संगमनेरमधील प्रत्येकी एकाचा तर नगर महापािलका क्षेत्रातील दोघांचा समावेश असून आत्तापर्यत १४१ रुग्णांनी करोनावर मात केली आहे. बाधितांचा आकडा २२३ वर गेला असून अद्याप २८ अहवालांची प्रतिक्षा आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -