घरमहाराष्ट्रपिंपरी-चिंचवडमध्ये गॅस गळती होऊन लागलेल्या आगीत दोन महिला जखमी

पिंपरी-चिंचवडमध्ये गॅस गळती होऊन लागलेल्या आगीत दोन महिला जखमी

Subscribe

पिंपरी-चिंचवडमध्ये गॅस गळती होऊन लागलेल्या आगीत दोन महिला गंभीर भाजल्या आहेत. त्यांच्यावर महानगर पालिकेच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

पिंपरी-चिंचवडमध्ये गॅस गळती होऊन लागलेल्या आगीत दोन महिला गंभीर भाजल्या आहेत. त्यांच्यावर महानगर पालिकेच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सकाळी अकराच्या सुमारास स्वयंपाक करत असताना अचानक गॅसने रेग्युलेटर पासून पेट घेतला. काही मिनिटातच होत्याचं नव्हतं झालं आणि घरातील सर्व वस्तू जळून खाक झाल्या. लक्ष्मी विलास धोतरे (वय ३५) आणि संगीता गणेश पवार (वय २८) असे घटनेत जखमी झालेल्या महिलांची नावे आहेत.

gas blast
गॅस गळती झालेले घर

चिंचवडच्या इंदिरानगर येथील बैठ्या चाळीमध्ये असलेल्या एलपीजी गॅस सिलेंडरच्या रेग्युलेटरमधून गॅसची गळती होवून अचानक आग लागली होती. या कुटुंबात तीन दिवसांपूर्वी एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे, त्याच्या तिसऱ्या दिवसाचा कार्यक्रम आज आयोजित केला होता. त्यामुळे स्वयंपाक करण्यात गृहिणी व्यग्र होत्या. अचानक रेग्युलेटरमधून गॅस गळती होऊन काही समजण्याच्या आत सर्वत्र पेट घेतला. यात दोन महिला गंभीर जखमी झाल्या आहेत. त्यांना तातडीने यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात नेण्यात आले असून सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे, अशी माहिती तेथील डॉक्टरांनी दिली आहे.

- Advertisement -

दरम्यान, घटना घडल्यानंतर अग्निशमन दलाच्या जवानांना पाचारण करण्यात आले. तेव्हा, पिंपरी येथील दोन तर प्राधिकरण येथील एक अग्निशमन गाड्या आल्या. त्यांना येण्यास खूप अडथळे आले, सदर घटनास्थळी पोहचण्यासाठी रस्त्यावर इलेक्ट्रिकल पोलवरील वायर मोठ्या प्रमाणात लोंबकळत असल्याने अग्निशमन वाहनांना व्यत्यय येत होता. मात्र तोपर्यंत तेथील नागरिकांनी आग आटोक्यात आणली होती.

हेही वाचा –

Video: जेएनयूला मोदींचे नाव द्या; भाजप नेत्याची मागणी

- Advertisement -

भारताच्या एकमेव रणरागिणीची ३०० पाकिस्तान्यांशी झुंज

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -