घरताज्या घडामोडी१० ते १२ आमदार मुख्यमंत्र्यांच्या संपर्कात, नव्या वर्षात पडसाद उमटणार; उदय सामंतांचं...

१० ते १२ आमदार मुख्यमंत्र्यांच्या संपर्कात, नव्या वर्षात पडसाद उमटणार; उदय सामंतांचं मोठं वक्तव्य

Subscribe

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केलेल्या वक्तव्यावरून मागील काही दिवसांपासून वाद सुरू आहे. छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. याच पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीकडून उद्या १७ डिसेंबर रोजी मुंबईत मोर्चा काढला जाणार आहे. दरम्यान, राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी रत्नागिरीत प्रसार माध्यमांशी बोलताना एक मोठं वक्तव्य केलं आहे.

१० ते १२ आमदार आमच्या संपर्कात आहेत. सरकार पाडण्याच्या किंवा निवडणुका लागण्याच्या गोष्टी काही लोकांनी केल्या असल्या तरी १७० हा आमचा बहुमताचा आकडा आहे. १० ते १२ आमदार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या संपर्कात आहेत. त्यामुळे बहुमताचा आकडा १८० ते १८२ पर्यंत जाऊ शकतो, असा दावा उदय सामंत यांनी केला आहे.

- Advertisement -

खरा धमाका तर पाच महिन्यांपूर्वीच झाला. परंतु त्याचे पडसाद नव्या वर्षात उमटणार, असं उदय सामंत म्हणाले. लांज्यामधील संपूर्ण नगरपंचायतच आमच्याकडे येत आहे, अशीही माहिती त्यांनी यावेळी दिली.

उदय सामंत यांनी केलेल्या या दाव्यामुळे आणि वक्तव्यामुळे ठाकरे गटाला पुन्हा खिंडार पडणार का? अशी चर्चा सुरू झाली आहे. आपल्या वक्तव्यामध्ये उदय सामंत यांनी एका विशिष्ट पक्षाचा उल्लेख जरी केला नसला, तरी त्यांचा रोख ठाकरे गटाच्याच दिशेने असल्याचं बोललं जात आहे.

- Advertisement -

हेही वाचा : ‘मविआ’च्या मोर्चाला परवानगी मिळालेली आहे; उपमुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्टीकरण


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -