अभिनेत्री रकुल प्रित सिंहला ईडीची नोटीस; टॉलिवूड ड्रग्ज मनी लाँड्रिंग प्रकरण

हे प्रकरण सन २०१७ चे आहे. २ जुलै २०१७ रोजी सीमा शुल्क विभागाने संगीतकार केलविन मस्कारेनहासला अटक केली होती. त्याच्याकडे तब्बल ३० लाख रुपये किमतीचे ड्रग्ज सापडले होते. त्याची कसून चौकशी करण्यात आली. चौकशीत त्याने धक्कादायक माहिती तपास यंत्रणांना दिली. चित्रपटाशी निगडीत मोठ्या व्यक्ती, कलाकार, स्फाॅटवेअर इंजिनिअर, काॅरपोरेट शाळांच्या मुलांना ड्रग्ज पुरवत असल्याची कबुली त्याने पोलिसांना दिली होती. त्यांच्या काॅन्टक्ट लिस्टमध्ये टाॅलिवूडच्या काही मोठ्या कलाकारांचे नंबर होते.

rakul preet singh arrives at the office of ed
Drugs Case: राकुल प्रीत सिंह ईडी कार्यालयात चौकशीसाठी हजर

नवी दिल्लीः टाॅलिवुड ड्रग्ज मनी लाँड्रींग प्रकरणी अभिनेत्री रकुल प्रित सिंहला सक्तवसुली संचलनालयाने (ईडी) चौकशीसाठी हजर राहण्याची नोटीस बजावली आहे. १९ डिसेंबरला रकुलची चौकशी होणार आहे. याप्रकरणी तेलगु चित्रपटातील अनेक कलाकारांची ईडीने चौकशी केली आहे.

हे प्रकरण सन २०१७ चे आहे. २ जुलै २०१७ रोजी सीमा शुल्क विभागाने संगीतकार केलविन मस्कारेनहासला अटक केली होती. त्याच्याकडे तब्बल ३० लाख रुपये किमतीचे ड्रग्ज सापडले होते. त्याची कसून चौकशी करण्यात आली. चौकशीत त्याने धक्कादायक माहिती तपास यंत्रणांना दिली. चित्रपटाशी निगडीत मोठ्या व्यक्ती, कलाकार, स्फाॅटवेअर इंजिनिअर, काॅरपोरेट शाळांच्या मुलांना ड्रग्ज पुरवत असल्याची कबुली त्याने पोलिसांना दिली होती. त्यांच्या काॅन्टक्ट लिस्टमध्ये टाॅलिवूडच्या काही मोठ्या कलाकारांचे नंबर होते.

त्यानंतर तपास यंत्रणांनी याची सखोल चौकशी सुरु केली. टाॅलिवूड कलाकारांना ड्रग्ज मिळत असल्याची माहिती २०२१ मध्ये समोर आली. त्यानुसार तपास यंत्रणांनी टाॅलिवूड कलाकारांची चौकशी सुरु केली. त्यांतर्गत ईडीने रकुल प्रित सिंह, बाहुबली फेम राणा दग्गुबाती, तेजा, पुरी जगन्नाथ,चार्ममे कौर व मुमैथ खानला चौकशीसाठी हजर राहण्याची नोटीस  बजावली आहे.

चित्रपटातील कलाकार ड्रग्जचे सेवन करत असल्याचे हे काही नवीन प्रकरण नाही. याआधी ड्रग्ज सेवन प्रकरणी अनेक कलाकारांची चौकशी करण्यात आली. अभिनेत्री दिपीका पादुकोण, श्रद्धा कपूर, सारा अली खान यांचीही ड्रग्ज सेवन प्रकरणी चौकशी करण्यात आली आहे. अभिनेता संजय दत्त, फरद्दीन खान यांना ड्रग्ज सेवनप्रकरणी अटक करण्यात आली होती. एका अभिनेत्याला तर न्यायालयाने केईएम रुग्णालयात पुनर्वसनासाठी पाठवले होते.

गेल्यावर्षी अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला अंमली पदार्थ प्रतिबंधक विभानाने अटक केली होती. एका क्रुझ पार्टीत ड्रग्जचे सेवन केले जाणार असल्याची माहिती विभागाला मिळाली होती. त्यानुसार विभागाने त्या पार्टीवर धाड टाकली होती. तेथे आर्यनला अटक करण्यात आली. ड्रग्ज बाळगल्याचा त्याच्यावर आरोप होता. हे प्रकरण खूपच चर्चेत राहिले होते. मात्र नंतर आर्यन विरोधात कोणताही पुरावा नसल्याचे विभागाने स्पष्ट केले.