घरठाणेकल्याणमध्ये परिमंडळात दोन महिने एकोणीस दिवसांत २४४७ गुन्हे दाखल

कल्याणमध्ये परिमंडळात दोन महिने एकोणीस दिवसांत २४४७ गुन्हे दाखल

Subscribe

मानपाडा पहिल्या तर कोळसेवाडी दुसऱ्या क्रमांकावर परिमंडळ तीनमध्ये आठ पोलिस ठाण्यांचा समावेश

कल्याण । नवीन वर्षात अवघ्या दोन महिने एकोणीस दिवसांत कल्याण पोलीस परिमंडळ-3 मध्ये 2447 गुन्हे दाखल झाले असून त्यात डोंबिवलीचे मानपाडा पोलीस ठाणे पहिल्या क्रमांकावर आहे. 1 जानेवारी ते 19 मार्च 2024 दरम्यान मानपाडा पोलिस ठाण्यात 417 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. गुन्हेगारी घटनांमध्ये कोळसेवाडी पोलीस ठाणे दुसऱ्या क्रमांकावर आहे. येथे एकूण 392 घटनांची नोंद झाली आहे. तसेच परिमंडळ तीनमध्ये तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या डोंबिवलीच्या रामनगर पोलिस ठाण्यात 349 गुन्हे दाखल झाले आहेत. कल्याण पोलीस परिमंडळ-3 मधील आठ पोलीस ठाण्यांपैकी अन्य पाच पोलीस ठाण्यांबाबत बोलायचे झाल्यास, गुन्हेगारी घटनांमध्ये डोंबिवलीचे विष्णुनगर चौथ्या, कल्याणचे महात्मा फुले पोलीस ठाणे पाचव्या, डोंबिवलीचे टिळकनगर सहाव्या, कल्याणचे बाजारपेठ सातव्या तर खडकपाडा पोलीस ठाण्यांचा आठवा क्रमांक लागतो.

गुन्हेगारी घटनांमध्ये मानपाडा पोलीस ठाणे अव्वल
कल्याणच्या अतिरिक्त पोलिस आयुक्त कार्यालयाच्या माहितीनुसार, डोंबिवलीचे मानपाडा पोलिस ठाणे गुन्हेगारी घटनांमध्ये पहिल्या क्रमांकावर आहे. हॉटेल्स, बार, रेस्टॉरंट याशिवाय एमआयडीसीच्या शेकडो कंपन्या या परिसरात असून, त्या ठिकाणी दररोज काही ना काही गुन्हेगारी घटना घडत असतात. दुसऱ्या क्रमांकावर कल्याण पूर्वेतील कोळसेवाडी पोलिस ठाणे असून, येथे उघड गुन्हेगारीसह राजकीय गुंडगिरी शिगेला पोहोचली आहे.

- Advertisement -

फक्त 24 पोलीस गस्त
कल्याण परिमंडळ-3 मध्ये आठ पोलिस ठाण्यांचा समावेश आहे. पोलिस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रत्येक पोलिस ठाण्यात 1 अधिकारी आणि 2 कर्मचारी असे एकूण 24 पोलिस कर्मचारी आठ पोलिस ठाण्याच्या परिसरात गस्त घालतात, हे क्षेत्रफळ आणि लोकसंख्येच्या दृष्टीने बादलीतल्या थेंबाप्रमाणे आहे.

1 जानेवारी ते 19 मार्च 2024 पर्यंत नोंदवलेल्या घटनांची संख्या

- Advertisement -

मानपाडा पोलीस स्टेशन- 417,
कोळसेवाडी पोलीस ठाणे- ३९२,
डोंबिवली पोलीस स्टेशन- ३४९,
विष्णुनगर पोलिस स्टेशन- 306,
महात्मा फुले पोलीस स्टेशन- 262,
टिळकनगर पोलिस स्टेशन- 242,
बाजारपेठ पोलीस स्टेशन- 241,
खडकपाडा पोलीस स्टेशन- 238,

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -