घरताज्या घडामोडीHindutva: महाराष्ट्र दिनी ठाकरे आमने सामने, औरंगाबादला राज ठाकरेंची, तर पुण्यात उद्धव...

Hindutva: महाराष्ट्र दिनी ठाकरे आमने सामने, औरंगाबादला राज ठाकरेंची, तर पुण्यात उद्धव ठाकरेंची सभा

Subscribe

महाविकास आघाडीची ३० एप्रिलला जाहीर सभा

राज्याचे मुख्यमंत्री १ मे रोजी पुण्यात जाहीर सभा घेणार आहेत. याच दिवशी औरंगाबाद येथे राज ठाकरे यांची जाहीर सभा आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील दोन प्रमुख पक्षांच्या सभा या महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने असणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी याआधीच एका कार्यक्रमात सर्व प्रश्नांना उत्तर देणारी सभा घेणार असल्याचे संकेत दिले होते. तर मनसेकडूनही औरंगाबाद येथे ठरलेल्या दिवशी आणि ठरलेल्या वेळीच सभा घेणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. तर महाविकास आघाडीची निर्धार सभा ही येत्या ३० एप्रिलला पुण्यातच आयोजित करण्यात आली आहे.

राज्यात हिंदुत्वाच्या आणि हनुमान चालीसेच्या मुद्द्यावर राजकारण तापलेले असतानाच दोन्ही ठाकरे बंधूंकडून महाराष्ट्राच्या दिनाच्या दिवशी सभांचे आयोजन करण्यात आले आहे. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील महाविकास आघाडी सरकारला राज ठाकरेंनी मशीदीवरील भोंगे काढण्यासाठीचा ३ मे रोजीचा अल्टीमेटम दिला आहे. तर उद्धव ठाकरेंनीही नव हिंदुत्ववाद्यांना येत्या दिवसात सभा घेऊन चोख उत्तर देणार असल्याचे स्पष्टीकरण दिले होते. उद्धव ठाकरेंनी एका कार्यक्रमात आमचे हिंदुत्व हे घंटाधारी नसल्याचे स्पष्ट केले होते. तसेच गधाधाऱ्यांना हिंदुत्व शिकवण्याच्या भानगडीत पडू नये असेही त्यांनी या कार्यक्रमात म्हटले होते. महाराष्ट्र दिनाला शिवसैनिकांना उद्धव ठाकरे संबोधित करतील.

- Advertisement -

दरम्यान मनसेच्या औरंगाबाद सभेआधीच शहरात जमावबंदीचे आदेश देण्यात आले आहे. तर मनसेने दुसरीकडे पोलिसांना सहकार्य करणार असल्याचे स्पष्ट केले आहे. राज ठाकरेंच्या औरंगाबाद येथील सभेसाठी मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी औरंगाबाद पोलीस आयुक्तांची आज भेट घेतली. त्यानंतर मनसेची सभा ही ठरलेल्या दिवशी आणि ठरलेल्या वेळीच होईल असेही स्पष्टीकरण त्यांनी यावेळी दिले.

महाविकास आघाडीची ३० एप्रिलला जाहीर सभा

महाविकास आघाडीच्या घटकपक्षांची ३० एप्रिलला पुण्यात जाहीर होणार आहे. पुण्यातील अलका चौकात राष्ट्रवादी कॉंग्रेस, शिवसेना आणि कॉंग्रेस नेत्यांची सभा होणार आहे. या सभेला निर्धार सभा असे नाव देण्यात आले आहे. पुण्यात ३० एप्रिलला महाविकास आघाडीची सभा होईल. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी १ मे रोजी पुण्यात उद्धव ठाकरेंची सभा असणार आहे. राज ठाकरेंकडून मविआ सरकारला टार्गेट केले जात असतानाच दुसरीकडे मविआची निर्धार सभा होणार आहे. या सभेसाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जितेंद्र आव्हाड, धनंजय मुंडे यांना आमंत्रित करण्यात आले आहे. तर कॉंग्रेसकडून यशोमती ठाकुर यांना आमंत्रित करण्यात आले आहे. शिवसेनेकडून मंत्रीमंडळातील मंत्री तसेच संजय राऊत यांना आमंत्रित केले जाणार असल्याची माहिती आहे.

- Advertisement -

 

Kiran Karande
Kiran Karandehttps://www.mymahanagar.com/author/kiran/
१२ वर्षांपासूनचा प्रिंट, डिजिटल असा प्रसारमाध्यम क्षेत्रातील अनुभव. वाहतूक, शिक्षण, नागरी सुविधा, ऊर्जा, हवामान विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -