घरमहाराष्ट्रUddhav Thackeray : राणेंच्या शंकराचार्यांवरील विधानावरून ठाकरे आक्रमक; BJP वर निशाणा साधताना...

Uddhav Thackeray : राणेंच्या शंकराचार्यांवरील विधानावरून ठाकरे आक्रमक; BJP वर निशाणा साधताना म्हणाले…

Subscribe

मुंबई : अयोध्येतील राम मंदिराचा येत्या 22 जानेवारीला उद्घाटन सोहळा होणार आहे. एकीकडे सर्वत्र उत्साहाचं वातावरण सुरू असतानाच दुसरीकडे राम मंदिराबाबत वाद सुरू आहेच. शंकराचार्यांनी राम मंदिराच्या उद्घाटन सोहळ्याला जाणार नसल्याचं म्हटले. यावर शंकराचार्यांनी हिंदू धर्मासाठी काय केलं? असा सवाल केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केला होता. यानंतर त्यांनी अवघ्या तासाभरात घुमजाव केले असेल तरी ठाकरे गटाने भाजपावर निशाणा साधला आहे. (Uddhav Thackeray aggressive over Narayan Rane statement on Shankaracharya Targeting BJP)

नारायण राणेंच्या वक्तव्यानंतर देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा  उद्धव ठाकरे म्हणाले की, देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले होते की, बाबरी किंवा राम मंदिराच्या लढ्यात शिवसेनेचे योगदान काय? तुम्ही तेव्हा हाफपँटमध्ये होतात. त्यानंतर आज सुक्ष्म आणि लघू म्हणाले की, शंकराचार्यांचे हिंदुत्वामध्ये योगदान काय? लाज नाही वाटतं? एकतर स्वतःचे फोटो छापता मोदी सरकारची गॅरंटी म्हणून. जर तुम्हाला शंकराचार्यांचा मान राखायचा नसेल तर नका राखू, पण त्यांचे हिंदुत्वात योगदान काय असं विचारता? आणि तुमच्याशी आम्ही हिंदुत्वासाठी युती करु.

- Advertisement -

हेही वाचा – Ram Mandir : शंकराचार्यांवरील ‘त्या’ वक्तव्यानंतर नारायण राणे यांचे अवघ्या तासाभरात घुमजाव; म्हणाले…

शंकराचार्यांचं योगदान विचारता पण तुमची लायकी काय?

आम्ही काहीही म्हटले की, लगेच अपमान अपमान बोंबलता. त्यामुळे माझं आज त्यांना जाहीर आवाहन आहे की, त्यांनी राम मंदिराच्या लोकार्पणाआधी हिंदुंची माफी मागावी. कारण शंकराचार्य आले तर तिथे त्यांचे फोटो लागणार, माझे फोटो कसे येणार? त्यांचा मानसन्मान ठेवता येत नसेल, तर तुम्ही त्यांचं योगदान विचारता पण तुमची लायकी काय? असा सवाल उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला आहे.

- Advertisement -

आम्ही अपशकुनी नाही

राम मंदिराचं उद्घाटन होताना भाजपा यांना काढणार आहे की नाही? कारण हे सुद्धा गद्दारच आहेत. पण शंकाराचार्यंचं योगदान विचारण्यापूर्वी भाजपाने पहिली हिंदूंची माफी मागितली पाहिजे. कारण राम मंदिराचं लोकार्पण होत आहे तर आम्ही देखील त्यात सहभागी आहोत, आम्हाला सुद्धा आनंद आहे. आम्ही अपशकुनी नाही आहोत, अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी हल्लाबोल केला.

हेही वाचा – Ayodhya Ram Mandir : निमंत्रण मिळाले नसले तरी अयोध्येला नक्की जाणार, पण…; शरद पवारांचे मोठे भाष्य

नारायण राणे काय म्हणाले?

शंकराचार्यांनी होणाऱ्या मंदिराला शुभेच्छा द्याव्यात की त्यावर त्यांनी टीका करावी? असा सवाल करत नारायण म्हणाले होते की, शंकराचार्य भाजपा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना राजकीय दृष्टीकोनातून पाहत आहेत. हे मंदिर राजकीय दृष्टीकोनातून होत नाही, तर धार्मिकतेने होत आहे. राम आमचं दैवत आहे. त्यासाठीच हे सगळं होत आहे आणि केलं जात आहे. शंकराचार्यांनी त्यांच्या आयुष्यातील हिंदू धर्मासाठी असलेले योगदान सांगावे? रामांनी हिंदू धर्माला जे योगदान दिलं तसं शंकराचार्यांना सांगावे? असे सवाल नारायण राणे उपस्थित केले होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -